AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं

India-US Trade Deal : 7 फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. टॅरिफ 50 टक्क्यावरुन 18 टक्क्यांवर आला. रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आला.

India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं
Modi-Trump
| Updated on: Apr 20, 2026 | 1:49 PM
Share

भारत आणि अमेरिकेमध्ये काही महिन्यापूर्वी ट्रेड डील फायनल झाली होती. पण त्यानंतर अमेरिकन कोर्टाने टॅरिफला बेकायद ठरवून रद्द केलं. आजपासून नव्याने ट्रेड डीलवर चर्चा सुरु होत आहे. या ट्रेड डीलमध्ये मोठे बदल होऊ शकतात. दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 12 अधिकाऱ्यांचं प्रतिनिधीमंडळ अमेरिकी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल. तीन दिवस ही चर्चा होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात होणारी चर्चा स्थगित झाल्यानंतर ही पहिली औपचारिक भेट आहे. भारताच्या प्रतिनिधीमंडळात वाणिज्य, सीमा शुल्क आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भारतीय प्रतिनिधी मंडळाची ही चर्चा होत आहे.

त्यानंतर ट्रम्प सरकारने 24 फेब्रुवारीपासून 150 दिवसांसाठी सर्वच देशांवर एक समान 10 टक्के टॅरिफ लावला. भारताला आता अमेरिकेकडून अन्य देशांच्या तुलनेत टॅरिफमध्ये कमी सवलत मिळते. या चर्चेनंतर टॅरिफमध्ये अजून कपात होईल अशी अपेक्षा आहे. 7 फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. टॅरिफ 50 टक्क्यावरुन 18 टक्क्यांवर आला. रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आला. भारताने सुद्धा अमेरिकेला व्यापक सवलत दिली. पुढच्या पाच वर्षांसाठी भारताने एनर्जी प्रोडक्‍ट्स, विमान, टेक्‍नोलॉजी आणि कोळशासह 500 अब्ज डॉलरपर्यंत अमेरिकी सामान विकत घेण्याचं उद्दिष्ट्य ठेवलेलं.

बदल घडवण्याचा प्रयत्न

जागतिक व्यापार समीकरणात अनेक बदल झाले आहेत. अमेरिकेला मागे टाकत चीन 2025-26 मध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला. अमेरिका चार वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. मागच्या आर्थिक वर्षात भारतातून अमेरिकी निर्यातीत 0.92% किरकोळ वाढ दिसली. व्यापार वाढून 87.3 अब्ज डॉलर झाला. आयातीत 16 टक्के वाढ झाली. 52.9 अब्ज डॉलरपर्यंत आयात वाढली. बीटीएवर अंतिम स्वाक्षरी होणं अजून बाकी आहे. भारतीय अधिकारी कराराला अंतिम रुप देण्याआधी त्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतील. समुद्री उत्पादन, ज्वेलरी, कपडा याची भारतातून अमेरिकेला प्रामुख्याने निर्यात होते. अमेरिकेकडून भारत शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणात विकत घेतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...