
पाकिस्तानात लवकरच बलूचिस्तान स्वतंत्र होऊ शकतो. बलूचिस्तानसोबत खैबर पख्तून-ख्वा प्रांताला सुद्धा पाकिस्तानी आर्मीच्या जाचापासून मुक्ती मिळू शकते. असं झाल्यास पाकिस्तानचे तीन तुकडे होणं निश्चित आहे. मग, उरणार फक्त सिंध आणि पंजाब. तिथे सुद्धा स्वातंत्र्याच वारं पसरेल. याची झलक खैबरच्या वजीरिस्तानमध्ये पहायला मिळालीय. तिथे रात्रीच्या अंधारात मोबाइल टॉर्च पेटवून पश्तून रस्त्यावर आले. तिथे ते घोषणा देत होते, ‘है हक हमारा आजादी… हम छीन के लेंगे आजादी.’
वजीरिस्तानात दिल्या जाणाऱ्या या घोषणांमुळे जनरल मुनीर यांच्या पायाखालची जमीन सरकू शकते. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ या घोषणा ऐकून अस्वस्थ आहेत. दोघांना समजत नाहीय की, आधी बलूचिस्तान संभाळायच की, खैबर पख्तूनख्वावर नियंत्रण मिळवायचं. कारण हे दोन्ही प्रांत वेगाने त्यांच्या हातून निसटत चालले आहेत.
तहरीके तालिबान मुनीरच्या सैन्यासाठी मोठी डोकेदुखी
वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून होणारे अत्याचार इतके वाढले आहेत की, तिथे पश्तून बंडखोर बनले आहेत. रस्त्यावर उतरुन आर्मी गो बॅक’च्या घोषणा दिल्या जात आहेत. सर्वप्रथम खैबर बद्दल जाणून घ्या. पाकिस्तानचा हा भाग अफगाणिस्तानला लागून आहे. बलूचिस्तानप्रमाणे इथे सुद्धा स्वातंत्र्याच्या मागणीच वारं वाहत आहे. खैबरमध्ये तहरीके तालिबान मुनीरच्या सैन्यासाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.
पाकिस्तानी सैन्याकडून आपल्याच देशात ड्रोन हल्ले
अफगाणिस्तानात तालिबानच शासन आल्यापासून TTP ने खैबरमध्ये आपली पकड घट्ट केली आहे असा पाकिस्तान सरकारचा आरोप आहे. ही संघटना खैबर आणि दुसऱ्या भागात दहशतवादी हल्ले करत आहे. TTP ला संपवण्यासाठी पाकिस्तानी सैन्य दीर्घकाळापासून ऑपरेशन राबवत आहे. पाकिस्तानी सैन्याच्या क्रूरतेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मे महिन्यात पाकिस्तानी सैन्याने इथे ड्रोन हल्ले केले होते. पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्य आपल्या देशाच्या एका भागात ड्रोन हल्ले करत होतं.
सैन्य शक्तीने चिरडण्याची मुनीरची भूमिका
पाकिस्तानी सैन्याचा दावा होता की, तिथे TTP चे दहशतवादी आहेत. पण सर्वसामान्य लोकांच म्हणणं आहे की, सैन्याने TTP च्या विरुद्ध ऑपरेशनच्या नावाखाली सामान्य पश्तून लोकांना मारलं. पाकिस्तान सरकारविरुद्ध पश्तून लोकांनी आवाज उठवला, त्यावेळी अनेक लोकांना बेकायद पद्धतीने अटक केली. खैबरमध्ये हजारोंच्या संख्येने बेकायद अटक झाली आहे. इथे मानवधिकाराच उल्लंघन आणि TTP ची मदत करणाऱ्यांची हत्या सुरु आहे. खैबरचे मुख्यमंत्री अमीन गंडापुर म्हणाले की, “TTP ला लढाईत हरवता येणार नाही. पण सैन्य शक्तीने TTP ला चिरडून टाकायचं ही मुनीर यांची भूमिका आहे”