Airstrike On Syria : मित्र मुस्लिम देशानेच सीरियाला दिला दगा, पुन्हा एअरस्ट्राइक

Airstrike On Syria : सीरियावर पुन्हा एकदा एअरस्ट्राइक झाला आहे. मागच्या आठवड्यातच सीरिया आणि इस्रायलमध्ये सीजफायर झालं होतं. यावेळी हल्ला एका मुस्लिम देशानेच केलाय. सीरियाचा त्याच्याच मित्र देशाने घात केला.

Airstrike On Syria : मित्र मुस्लिम देशानेच सीरियाला दिला दगा, पुन्हा एअरस्ट्राइक
Air Strike
Image Credit source: World Defence Forum/Facebook
| Updated on: Jul 21, 2025 | 2:52 PM

इस्रायलसोबत सीजफायर झाल्यानंतरही सोमवारी सीरियाच्या अलेप्पो शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव झाला. हा एअरस्ट्राइक इस्रायलने नाही, तर सीरियाचा मित्र असलेल्या तुर्कीने केला. यात सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेसच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. ड्रूज समुदायाच्या संरक्षणासाठी मागच्या आठवड्यात इस्रायलने सीरियावर हल्ले केले होते. आता दोन्ही देशांमध्ये सीजफार झालं आहे. सीरियामध्ये आता शांतता येतेय असं वाटतं होतं. सोमवारी तुर्कीने जे केलं, त्यामुळे पुन्हा एकदा सीरियावर संकट आलं आहे. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, सीरियाच्या उत्तरी अलेप्पोमध्ये सोमवारी तुर्कीच्या फायटर जेट्सनी मोठा हल्ला केला. SDF चे तळ या विमानांच्या टार्गेटवर होते. या हल्ल्यात किती जिवीतहानी झालीय, त्या बद्दल अजून माहिती नाहीय.

तुर्की हा सीरियाचा मित्र देश आहे. तुर्कीने बॉम्बफेकीत SDF ला टार्गेट केलं. याचं कारण YPG आहे. हा कुर्द फायटर्सचा एक गट आहे. या संघटनेला तुर्की, अमेरिका आणि EU दहशतवादी संघटना मानतात. YPG कुर्द फायटर्स दुसरी संघटना PKK चे सहकारी आहेत. तुर्की या संघटनांना आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानते. सीरियन सीमेच्या आत जवळपास 30 किलोमीटरच्या भागावर SDF चा ताबा आहे. हा भाग त्यांच्या तावडीतून मुक्त करण्याचा तुर्कीचा प्रयत्न आहे. या भागाला सेफ झोन घोषित करुन तिथे शरणार्थी स्थायिक करण्याचं प्लानिंग आहे. तुर्कीला SDF वर हल्ला करुन अमेरिकेवर दबाव टाकायचा आहे. अमेरिका SDF च्या बाजूने आहे. ISIS विरुद्ध सामना करण्यासाठी अमेरिकेकडून SDF ला अनेक शस्त्रास्त्र देण्यात आली होती.

पडद्यामागून तुर्कीने काय केलं?

तुर्कीने या भागात SDF आणि YPG वर हल्ला करणं सामान्य बाब आहे. तुर्की या भागात अनेकदा रॉकेट आणि ड्रोनव्दारे हल्ले करत असतो. तुर्कीने या हल्ल्याला आत्मरक्षणासाठी उचलेलं पाऊल म्हटलं आहे. बशर अल असद सीरियामधून पळून गेल्यानंतर तुर्कीने पहिल्यांदा असं पाऊल उचललय. सध्या सीरियावर अहमद अल शरा याचं शासन आहे. तो HTS चा प्रमुख आहे. मिडिल ईस्टचे एक्सपर्ट मानतात की, तुर्कीचा सीरियामधील सत्तापालटात थेट हात नव्हता. पण HTS ला सपोर्ट करण्यात आणि अल शराला राष्ट्रपती बनवण्यासाठी पडद्यामागून तुर्कीने सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेली.