AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UAE ने कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तान उलटा फिरला, उपकार विसरुन त्यांची खरी लायकी दाखवली

संयुक्त अरब अमीरात म्हणजे UAE ने पाकिस्तानला त्यांच्या पडत्याकाळात भरभरुन आर्थिक मदत केली. गरज ओळखून कर्ज दिलं. आता यूएईने त्या कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाकिस्तानने आपली नियत दाखवून दिलीय.

UAE ने कर्जाची परतफेड करायला सांगताच पाकिस्तान उलटा फिरला, उपकार विसरुन त्यांची खरी लायकी दाखवली
shenbaz sharif
| Updated on: Apr 07, 2026 | 11:26 AM
Share

पाकिस्तानची आर्थिक स्थिती आधीपासूनच खराब आहे. इराण युद्धाने त्यांचं कंबरडं आणखी मोडून टाकलं आहे. तिथे लॉकडाऊन सारखे निर्बंध घालावे लागले आहेत. युद्धामुळे पाकिस्तानला तेल संकटाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे काहीही करुन हे युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान जोरात हात-पाय मारताना दिसतोय. इतकी सगळी वाईट परिस्थिती असूनही पाकिस्तानचा माज काही कमी होण्याचं नाव घेत नाहीय. ज्या संयुक्त अरब अमीरातने वाईट काळात पाकिस्तानला साथ दिली. त्यांच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला मदतीचा हात दिला. पण आज त्याच पाकिस्तानने आपले खरे रंग दाखवून दिलेत. UAE वर हा देश उलटा फिरला. यूएईने कर्जापोटी दिलेले पैसे परत मागताच पाकिस्तानची खरी नियत दिसली. कर्जासाठी आभार मानण्याऐवजी पाकिस्तानी नेत्याने यूएईला टोला लगावला.

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन संयुक्त अरब अमीरातकडून घेतलेलं 3.5 अब्ज डॉलरच कर्ज परत करणार असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेचे गव्हर्नर जमील अहमद यांना असं वाटलेलं की, यूएई कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवून देईल. पण असं झालं नाही. कर्ज फेडण्याची मजबुरी आणि यूएईचा दबाव यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री मुशाहिद हुसैन यांनी वादग्रस्त स्टेटमेंट करुन आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

‘अखंड भारता’ची भिती दाखवली

“पाकिस्तानने पैसे परत करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. कारण यूएईला याची जास्त गरज आहे. येमेन आणि सूदान सारख्या युद्धात ते फसले आहेत. म्हणून त्यांना पैशांची गरज आहे” असं मुशाहिद हुसैन म्हणाले. माजी पाकिस्तानी मंत्र्याने कर्ज परतफेडीच्या मुद्यावर बोलताना यूएईसाठी वारंवार बिचारा शब्द प्रयोग केला. इतकचं नाही मुशाहिद हुसैन यांनी यूएईला ‘अखंड भारता’ची भिती दाखवली. “यूएईच्या एकूण 1 कोटी लोकसंख्येत 43 लाख लोक भारतीय आहेत. त्यामुळे ते उद्या ‘अखंड भारताचा’ भाग बनणार नाहीत याची त्यांनी काळजी घ्यावी”

पाकिस्तानला किती देश कर्ज देतात?

यूएईने पैसे परतफेडीची मागणी करणं हे पाकिस्तानसाठी एका वाईट स्वप्नासारखं आहे. एक्सपर्ट्सनुसार हे कर्ज रिर्टन केल्यामुळे पाकिस्तानातून पैशांचा एक मोठा फ्लो निघून जाईल. शहबाज सरकारची स्थिती यामुळे अजून खराब होऊ शकते. पाकिस्तानची सर्व अर्थव्यवस्था चीन, सौदी अरेबिया आणि यूएईकडून मिळालेल्या कर्जावर टिकून आहे. हे देश दरवर्षी कर्ज परतफेडीचा कालावधी वाढवतात. त्यामुळे पाकिस्तानचं निभावून जायचं. पण यूएईने आता अचानक पैसे परत मागितले आहेत.

Follow Us
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...