Pahalgam Terrorist Attack : PAK ला धडा शिकवण्याची हीच उत्तम वेळ का आहे? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या

Pahalgam Terrorist Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान जाम टेन्शनमध्ये आहे. भारत कुठून वार करणार? याच चिंतेमध्ये ते आहेत. भारताने पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी हीच उत्तम वेळ का आहे? ते पाच पॉइंटमधून समजून घ्या.

Pahalgam Terrorist Attack : PAK ला धडा शिकवण्याची हीच उत्तम वेळ  का आहे? 5 पॉइंटमध्ये समजून घ्या
Narendra Modi-Ajit Doval
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 25, 2025 | 11:57 AM

पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात काय होणार? दिल्ली ते इस्लामाबादपर्यंत ही चर्चा सुरु आहे. या चर्चांशिवाय 5 असेही फॅक्टस आहेत, ज्यानुसार, पाकिस्तानला धडा शिकवण्याची ही उत्तम संधी आहे. जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये ज्या दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केला, त्यांचं थेट कनेक्शन पाकिस्तानशी आहे. भारत सीमापार लपून बसलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी काय करणार? ही चर्चा आहे.

हीच पाकिस्तानला धडा शिकवण्याची उत्तम संधी का? 5 पॉइंटमधून समजून घ्या

पहिला पॉइंट

पाकिस्तानात शहबाज शरीफ नावाला पंतप्रधान आहेत. पण त्यांच्या हातात काही नाहीय. तिथे आघाडी सरकार असल्यामुळे बिलावल भुट्टे यांचा पक्ष सतत सरकारला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करतोय. IMF च्या निर्देशामुळे शहबाज आपल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना पदावर नेमू शकत नाहीयत. पाकिस्तानने IMF कडून मोठ्या प्रमाणात कर्ज उचललय. त्यामुळे पाकिस्तान त्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करु शकत नाही.

दुसरा पॉइंट

पाकिस्तानात अंतर्गत यादवी सुरु आहे. खैबर-पख्तूनवाहमध्ये तहरीक-ए-तालिबानने धुमाकूळ घातला आहे. टीटीपीला अफगाणिस्तानच्या तालिबानच समर्थन आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार टीटीपीला अमेरिकेकडून शस्त्र मिळत आहेत. टीटीपीचे अतिरेकी दिवसा-ढवळ्या पाकिस्तानी सैनिकांची हत्या करत आहेत.

तिसरा पॉइंट

बलूचिस्तानात तिथल्या बंडखोर संघटना पाकिस्तानच्या मूळावर उठल्या आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तानी सैन्यावर सतत हल्ले सुरु आहेत. तिसऱ्याबाजूला इमरान खान यांचा पक्ष सरकार आणि सैन्याला आव्हान देत आहे. सैन्याविरोधात असल्यामुळे इम्रान खान आदियाला तुरुंगात बंद आहेत.

चौथा पॉइंट

पाकिस्तानी सैन्यावर जनतेला विश्वास उरलेला नाही. ताकदीच्या बळावर पाकिस्तानी सैन्य तिथल्या सत्तेवर पकड ठेऊन आहे. 2024 साली एका सर्वेमधून समोर आलेलं की, 26 टक्के लोकांनी थेट सांगितलेलं की, पाकिस्तानी सैन्यावर जनतेचा विश्वास नाहीय.

पाचवा पॉइंट

पाकिस्तानला आतापर्यंत शस्त्र आणि अन्य संरक्षण साहित्य चीन-अमेरिका या देशांकडून मिळत होतं. सध्या हे दोन्ही देश परस्पराविरोधात आहेत. अमेरिकेने थेटपणे सांगितलय की, ते कुठल्याही देशाची मदत करणार नाहीत. चीनचा तैवान, जपान आणि फिलिपींस या देशांशी वाद चालू आहे. त्यामुळे उद्या युद्ध झाल्यास हे दोन्ही देश पाकिस्तानला थेट समर्थन देणार नाहीत. चीनला भारताची क्षमता आणि आर्थिक ताकद याची कल्पना आहे. चीनसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे ते पाकिस्तानला साथ देणार नाहीत.