Video : भूकंपाच्या धक्क्याने इमारती हादरल्या! लोकांची सैरावैरा रस्त्यावर पळापळ! मॅक्सिकोत हाहाकार

Mexico Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानंतर आता मॅक्सिकोत त्सुनामीचीही भीती व्यक्त केली जाते आहे. तसा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर आत्पकालीन यंत्रणानाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे.

Video : भूकंपाच्या धक्क्याने इमारती हादरल्या! लोकांची सैरावैरा रस्त्यावर पळापळ! मॅक्सिकोत हाहाकार
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: Social Media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Sep 20, 2022 | 6:50 AM

तैवाननंतर (Taiwan Earthquake) आता मॅक्सिकोत भूकंपाच्या (Mexico Earthquake) धक्क्यामुळे एकच खळबळ उडाली. लोकांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. दहशतीखाली असलेले लोक भूकंपांच्या धक्क्यानंतर सैरावैरा रस्त्यावर पळत सुटले होते. भूकंपाचे धक्के जेव्हा जाणवले, त्यावेळी मॅक्सिकोतील इमारतींनाही हादरा बसला. इमारती हादरल्याचे काही व्हिडीओदेखील (Earthquake Video) समोर आले आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास मॅक्सिकोत जबरदस्त भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.

यूएस जीओलॉजिकल सर्व्हेनं दिलेल्या माहितीनुसार, मॅक्सिकोत झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केल इतकी होती. ला प्लासिटा मोरेलॉसच्या समुद्रात 10 किलोमीटर खोल भूकंपाचं मुख्य केंद्र होतं. मॅक्सिकोच्या मिचोओकन या राज्यात भूकंप झाल्यानंतर लोक प्रचंड घाबरली होती.

भूकंपाच्या धक्क्यानंतर आता मॅक्सिकोत त्सुनामीचीही भीती व्यक्त केली जाते आहे. तसा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर आत्पकालीन यंत्रणानाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आला आहे.

Video : इमारती हादरल्या

याआधी मॅक्सिकोत 1985 आणि 2017मध्येही भूकंप झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. आता काही व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आले आहेत. हे व्हिडीओ मॅक्सिकोतील भूकंपाच्या धक्क्यानंतरचे असल्याचा दावा करण्यात येतोय. या व्हिडीओची पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र या व्हिडीओमधील दृश्य काळजाचा थरकाप उडवणारी आहेत.

Video : रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचा थरकाप

Video : हॉटेलमधील रुममध्ये खळबळ

Video : लोकांची घाबरगुंडी

दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इमारती हलत असल्याचं. रस्त्यावर उभी असलेली गाडी जोरजोरात हलत असल्याचं, काही लोकं जमिनीवर बसली आहेत आणि त्यांचा लोक भूकंपाच्या धक्क्यामुळे जात असल्याचं दिसून आलं आहे. या सर्व व्हिडीओमध्ये घाबरलेल्या लोकांचा आरडाओरडाही स्पष्टपणे ऐकू आलाय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, रविवारी जपानच्या तैवानमध्ये रविवारी भूकंपाचे एकामागोमाग एक असे तीन धक्के बसले होते. त्यानंतर जपानमध्येही त्सुनामीची भीती वर्तवण्यात आली होती. या भूकंपाने तैवानमध्ये मोठं नुकसान झालंय. तैवानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 7 रिश्टर स्केल पेक्षाही जास्त असल्याची नोंद करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें