Israel-Iran War: भीषण युद्धाला तोंड फुटले, निवासस्थानजवळच मोठा स्फोट, अयातुल्ला खोमेनी आहेत कुठे?

Ayatollah Ali Khomeini: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या निवासस्थानावरच इस्त्रायलने क्षेपणास्त्र डागले. या ठिकाणी भीषण स्फोट झाला. आता इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळावर जोरदार हल्ले चढवण्यात आले. शेजारील आठ देशांतील तळावर हा हल्ला करण्यात आला. पण खोमेनी आहेत कुठे, असा सवाल विचारला जात आहे.

Israel-Iran War: भीषण युद्धाला तोंड फुटले, निवासस्थानजवळच मोठा स्फोट, अयातुल्ला खोमेनी आहेत कुठे?
अयातुल्ला खोमेनी आहेत कुठे?
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 28, 2026 | 4:13 PM

Israel Attacks On Iran: इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर जोरदार हल्ला चढवला. सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या निवासस्थानासह कार्यालयावरही क्षेपणास्त्र डागले. पण हाती आलेल्या माहितीनुसार, हल्ला होणार हे अगोदरच गृहित होते. त्यादृष्टीने इराणने जबरदस्त व्युह रचना करण्यात आली होती. खोमेनी हे तेहरानमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सुरुवातीच्या हल्ल्यातच इस्त्रायलने इराणचे लष्करी तळ आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे ठिकाणांवर हल्ला चढवला. यावेळी राष्ट्रपती भवन आणि त्यांचे निवासस्थान लक्ष्य करण्यात आले. पण खोमेनी हे सुरक्षित आहेत. ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून हल्ल्याचे निर्देश देत असल्याची माहिती समोर येत आहे. तर इस्त्रायलने त्यानंतर आता इराणमधील गुप्त ठिकाणांवर हल्लाबोल सुरू केल्याचे समजते.

खोमेनी अगोदरच सुरक्षित ठिकाणी

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी (Ayatollah ali khamenei) यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर एकामागून एक क्षेपणास्त्र डागण्यात आली. पण खोमेनी हे अगोदरच सुरक्षित ठिकाणी पोहचले. ते तेहरानमध्ये नाहीत. हल्ला होणार हे माहिती असल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणचे लष्करी तळ, अणू चाचण्यांचे ठिकाणं आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या ठिकाणांवर भीषण हल्ला केला. पण खोमेनी अगोदरच गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी असल्याचे समोर येत आहे.

इराणचा तुफान पलटवार

इराणने अमेरिकेच्या सैन्य तळावर जोरदार हल्ला सुरू केला आहे. शेजारील आठ देशातील नाविक दल आणि वायू दलाच्या तळावर इराणकडून हल्ले करण्यात येत आहे. इराणने स्ट्रॅटर्जी वापरल्याचे दिसून येत आहे. इराण सावध होता हे आता समोर येत आहे. इराणने इस्त्रायलवर 70 बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला चढवला. इस्त्रायलचे लष्कर IDF ने हल्ला झाल्याचे कबूल केले आहे. संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इस्त्रायलयेच कंबरडं मोडण्याची भाषा केली आहे. इस्त्रायलने स्वप्नात विचार केला नसेल इतके क्षेपणास्त्र या देशावर डागण्याचा इशारा कॉर्प्सने दिला आहे. आता तर ही पहिली टोळधाड पडली आता अनेक क्षेपणास्त्रांना इस्त्रायलला सामना करावा लागणार आहे असा दम इराणने दिला आहे. इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक देशाच्या शत्रूंना आणि त्यांच्या गुन्ह्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांना धडा शिकवणार असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या एका तासात इराणने इस्त्रायलवर अनेक बॅलेस्टिक मिसाईल सोडण्यात आले. पण येथील क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीमुळे अद्याप इस्त्रायलमधून कोणी गंभीर जखमी झाल्याचे वा ठार झाल्याची एकही वार्ता समोर आलेली नाही. या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीला सुरूंग लावण्याचे काम करण्यात येणार आहे. तर इराणच्या पाठिंब्यासाठी दहशतवादी संघटना हुती आणि हिजबुल्लाह पण मैदानात उतरली आहे. या दोन्ही संघटना इस्त्रायलवर हल्ले चढवत आहेत.

Follow Us