AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर, इराणकडून थेट 7 देशांवर धडाधड हल्ले, तोफखानाच उघडला, क्षेपणास्त्रांचा पाऊस

Iran Israel America War: अण्वस्त्रावरून सुरू असलेली बोलणी फिसकटल्यानंतर इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला चढवला. तर आता इराणने अमेरिकेच्या कहयात असलेल्या 7 देशांवर हवाई हल्ला चढवला आहे. त्यामुळे जग मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर, इराणकडून थेट 7 देशांवर धडाधड हल्ले, तोफखानाच उघडला, क्षेपणास्त्रांचा पाऊस
इराणचे प्रतिहल्ले सुरूImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 28, 2026 | 3:29 PM
Share

Iran Israel America War : अण्वस्त्र करारावर बोलणी फिसकटत नाही तोच इस्त्रायलयाने अमेरिकेच्या मदतीने इराणवर हल्ला चढवला. तेहरान सह इराणमधील सहा शहरांवर क्षेपणास्त्र डागली. खोमेन यांच्या घराशेजारी स्फोट घडवून आणला. या हल्ला अपेक्षितच होता. त्यामुळे इराणही तयारीत होता. आता इराणने इस्त्रायलसह अमेरिकेच्या कहयात असलेल्या शेजारील सात देशांवर हल्ला चढवला आहे. या देशातील अमेरिकन नौदल आणि वायू दलाच्या ठिकाणांवर इराणने ताबडतोब हल्ले चढवले. त्यामुळे जग आता मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे बोलले जात आहे. यामुळे जगभरात पुन्हा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या धोरणावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी जोरदार टीका केली आहे.

7 देशांतील  अमेरिकन तळावर हल्ला

इराण या युद्धासाठी तयारच होता असे दिसते. गेल्या काही वर्षात इराण सातत्याने अमेरिकेला नजर भिडवत आहे. इराण अद्यापही झुकलेला नाही. इराणने तडजोड दाखवली. पण अमेरिकेला इराणमध्ये कठपुतली, बाहुले सरकार आणायचे आहे. खोमेनी यांची सत्ता उलथवून टाकायची आहे. त्यासाठी लोकशाहीच्या आंदोलनाचे गोंडस नाव अमेरिकेने पुढे केले आहे. पण मध्य-पूर्वेतील इंधन साठ्यावर अमेरिकेला प्रभुत्व मिळवायचे आहे. त्यामुळे किंमती अमेरिकेच्या मर्जीप्रमाणे ठरतील.

तर इराणला युद्ध होणार हे ठाऊक होते. त्यामुळे इराणने हल्ले होताच, थेट शेजारच्या सात देशांवर हल्ले चढवले. या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ले चढवण्यात आले. इस्त्रायल, कतार, कुवैत, बहरीन, जॉर्डन, UAE (Israel Qatar Kuwait Bahrain Jordan) यासह अजून एका देशावर इराणने हल्ला चढवला. येथील अमेरिकेच्या नाविक दलाला टार्गेट करण्यात आले. इस्त्रायलवर तर क्षेपणास्त्रांचा पाऊसच पाडण्यात आला. तर काही ठिकाणी नाविक दलासोबतच अमेरिकेच्या वायू दलाच्या ठिकाणावरही हल्ला चढवण्यात आला.

इराणचा या ठिकाणी थेट हल्ला

1. इराणने पहिला हमला इस्त्रायलची राजधानी तेल अवीववर केला. राजधानीवर इराणने क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. या शहरात अगोदरच आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

2. इराणने या नंतर बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला चढवला. येथे अमेरिकेने एफ-12 तैनात केले आहेत. हा तळ इराणने उद्धवस्त केला.

3. इराणने या नंतर युएईमधील अबू धाबी येथील अमेरिकेच्या तळाला लक्ष्य केले. अबुधाबीत हल्ला होताच युएईमध्ये सायरन वाजले. लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले.

4. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणने दोहा येथील अमेरिकन लष्करी तळावर हल्ला चढवाल. येथे क्षेपणास्त्र डागण्यात आली.

5. इराणने सौदी अरबची राजधानी रियादवर हल्ला केला. येथील अमेरिकन लष्करी तळ लक्ष्य करण्यात आले. सौदीने लागलीच अलर्ट जारी केला.

6. इराणने जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या मुख्य तळावर मोठा हल्ला चढवला. जॉर्डन हा इस्त्रायला खेटून आहे. जॉर्डन येथील लष्करी तळावर अमेरिकेचे एफ-22 तैनात आहेत.

7. इराणने यानंतर कुवैतवर पण हल्ला चढवला. कुवैतमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्वेत गोंधळ उडाला आहे. नागरीक भयभीत झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...