AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेतही ‘लाडकी बहीण’? निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेत मध्यावधी निवडणुका जवळ असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष डिव्हिजन आणि टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. मेलानिया ट्रम्प यांच्या पाठबळाने सुरू झालेल्या या योजनेत महिलांच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारची एक महत्त्वपूर्ण राजकीय रणनीती मानली जात आहे.

अमेरिकेतही 'लाडकी बहीण'? निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांची मोठी घोषणा
Donald Trump Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2026 | 4:54 PM
Share

अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या दोन आठवड्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीने महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लाडक्या बहिणींचं आरोग्य चांगलं व्हावं म्हणून एका महत्त्वाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्या पाठबळामुळे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी एक विशेष डिव्हिजन तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय व्हाइट हाऊसमध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर काम करण्यासाठी एक टास्क फोर्सही बनवण्यात आली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आपल्याकडे वळवण्यासाठी ट्रम्प सरकारनेही प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे.

अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका होत आहेत. ही निवडणूक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी अग्निपरीक्षाच आहे. सध्या अमेरिकेत वाढलेली महागाई, टॅरिफ आणि इराणशी सुरू असलेला संघर्ष यामुळे ट्रम्प यांची प्रतिमा मलिन झाली आहे. ट्रम्प यांच्यावर नागरिक नाराज आहेत. त्यामुळे महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी ही नवी चाल खेळण्यात येत आहे. म्हणूनच महिलांच्या आरोग्याशी संबंधित नव्या आदेशावर ट्रम्प यांनी सही केली आहे. महिलांचे आजार आयडेंटिफाय व्हावेत, त्यांच्यावर उपचार करावेत, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर महिलांचं आरोग्य उत्तम राहावं, असा या मागचा हेतू आहे. ट्रम्प सरकारचं हे हेल्दी गिफ्ट महिलांसाठी वरदानच ठरणार आहे.

महिलांची स्थिती बिघडली

यावर फर्स्ट लेडी मेलानिया यांची प्रतिक्रिया आली आहे. या योजनेत छोट्या मुलींसह आई बनल्यानंतर जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिला आणि वयस्क महिलांचाही समावेश आहे. अमेरिकेत पुरुषी वर्चवस्व असणारी संस्कृती आहे. मुलींचं बालपणही सुरक्षित राहिलेलं नाहीये, असं मेलानिया म्हणाल्या. सेंटर फॉर डिसिस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार, अमेरिकेत सुमारे 41 टक्के महिलांना आपल्या जवळच्या साथीदाराकडून लैंगिक शोषण, शारीरिक हिंसा किंवा पाठलाग होण्याच्या प्रकाराला सामोरे जावं लागतं. या शिवाय ट्रम्प सरकार आल्यानंतर 18 विधानसभांमद्ये अबॉर्शनवर बंदी घालण्यात आली आहे. तर टेक्सासमध्ये राज्यपालांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक नवीन कायदा पारित केला आहे. त्यानुसार महिलांना गर्भपात करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात खटला चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आणि खटला चालवावा म्हणून 100,000 डॉलरचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!