AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य

अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अँथनी फौसी यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. Anthony Fauci Covaxin

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य
Dr. Anthony Fauci
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: | Updated on: May 22, 2021 | 10:26 AM
Share

नवी दिल्ली: अमेरिकेचे संसर्ग रोग तज्ज्ञ आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अँथनी फौसी यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भारत बायोटेकनं बनवलेली कोवॅक्सिन लस कोरोना विषाणूच्या बी. 1.617 वेरियंटला प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरतेय, असं वक्तव्य डॉ.अँथनी फौसी यांनी केलं आहे. (American House Chief Medical Adviser Anthony Fauci said Covaxinproduced by Bharat Biotech has been found to neutralise the B.1.617)

डॉ.अँथनी फौसी नेमकं काय म्हणाले?

डॉ.अँथनी फौसी म्हणाले आम्हाला आता दररोज माहिती मिळत आहे. अलीकडेच प्राप्त झालेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूच्या बी. 1.617 वेरियंटला प्रतिबंध करण्यात यशस्वी ठरतेय, असं डॉ.अँथनी फौसी म्हणाल्याचं वृत्त पीटीआयया वृत्तसंस्थेने दिलं आहे.

भारतापुढे नेमकं आव्हान काय?

भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जातोय. भारतात कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी लसीकरण महत्वाचा घटक आहे. नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे, असं डॉ.अँथनी फौसी म्हणाले.

कोवॅक्सिन लस भारताची निर्मिती

आयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी आणि भारत बायोटेक यांनी एकत्रित येऊन कोवॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे. कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला 3 जानेवारीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली होती.

भारतात सध्या दोन लस मान्यताप्राप्त

सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ यांना मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1 मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

संबंधित बातम्या:

कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

(American House Chief Medical Adviser Anthony Fauci said Covaxin produced by Bharat Biotech has been found to neutralise the B.1.617)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली