कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. (Bharat Biotech Investment in covaxine)

कोव्हॅक्सिनसाठी भारत बायोटेकची गुंतवणूक किती? जाणून घ्या सर्व माहिती

नवी दिल्ली : अमेरिकन औषधी कंपनी फायझर आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ पाठोपाठ हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. काल (7 डिसेंबर) भारत बायोटेक या कंपनीने केंद्रीय औषधी नियामक अर्ज केला आहे. भारत बायोटेक ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) सोबत मिळून स्वदेशी कोरोना लस विकसित करत आहे. (Bharat Biotech Investment in covaxine)

कोरोना संकटात भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात केली होती. ही स्वदेशी लस ICMR च्या मदतीने भारत बायोटेकद्वारे बनवण्यात येत आहे. ही लस 60 टक्के यशस्वी ठरेल असा दावा कंपनीने केला होता.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीने कोरोना विषाणूच्या एक घटक वेगळा केला होता. त्याद्वारे भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात या लसीचे इंजेक्शन दिले. तर त्यानंतर कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो. तसेच या लसीमुळे अँटीबॉडीची निर्मिती होते.

कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी देशभरातील 22 ठिकाणी केली जात आहे. जवळपास 22 ठिकाणच्या 26 हजार स्वंयसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. या लसीचे साठवणूक करण्यासाठी 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता आहे.

दरम्यान अद्याप या कंपनीने कोरोना लसीची किंमत नेमकी किती असेल, याची कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र  कोव्हॅक्सिनची किंमत ही 100 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन या लसीला विकसित करण्यासाठी आणि उत्पादन सुविधेसाठी जवळपास 300-400 कोटींची गुंतवणूक केली आहे. भारत बायोटेक या कंपनींचा लस बनवण्याचा इतिहास फार उत्तम आहे. जगभरात याचे 400 पेटेंट आहेत. या कंपनीने आतापर्यंत 16 लसी विकसित केल्या आहेत.  (Bharat Biotech Investment in covaxine)

संबंधित बातम्या :

मोदी सरकारचा सीरम कंपनीशी करार; कोरोनाची लस अवघ्या 250 रुपयांत मिळणार

COVID-19 Vaccine Emergency Usage | भारतात ऑक्सफर्ड लशीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळणार की नाही?, दोन आठवड्यात निर्णय