चीन नाहीच सुधारणार, डोकलामजवळ चीनने पसरले पाय, थेट उपग्रहाच्या फोटोतून..

भूतानसोबत चीनचा मोठा सीमावाद आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सीमावाद मिटवण्यासाठी त्यांच्यात बैठका झाल्या. मात्र, तोडगा हा काही निघू शकला नाही. त्यातच आता चीनने मोठी खेळी केल्याचे बघायला मिळत आहे. चीनची मोठी पोलखोल झाली.

चीन नाहीच सुधारणार, डोकलामजवळ चीनने पसरले पाय, थेट उपग्रहाच्या फोटोतून..
China
| Updated on: Nov 24, 2026 | 1:33 PM

भूतान आणि चीन यांच्यातील सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला. चीन आणि भूतान दोन्ही देश हार मानण्यास तयार नाहीत. कित्येक वर्षांनंतर  दोन्ही देश या सीमावादावर समोरासमोर बसून चर्चा देखील करतात. मात्र, तोडगा हा नाहीत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. डोकलामच्या पश्चिमेला असलेल्या भूतानमधील तोर्सा नदी खोऱ्याजवळ जमीन साफ ​​केल्याचे काही फोटो उपग्रह फोटोंच्या माध्यमातून पुढे आले. संरक्षण तज्ज्ञ डॅमियन सायमन यांनी याबाबतचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केली. सायमनने शेअर केलेल्या उपग्रह फोटोंवरून दिसते की, डोकलामच्या पश्चिमेला असलेल्या तोर्सा नदीच्या भागात जमीन मोकळी केली जात आहे. मात्र, या ठिकाणी नक्की कोणते बांधकाम सुरू आहे, याबाबतची माहिती पुढे येऊ शकली नाही.

या नव्याने मोकळ्या केलेल्या परिसराच्या आसपास चीनने आधीच तीन गावे निर्माण केली आहेत. त्यातच आता पुन्हा बांधकाम सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. चिनी कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा प्रदेश दीर्घकाळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. 2020 मध्ये भूतानने दावा केला की, चीन या प्रदेशात गावे तयार करत असून तिथे वस्त्या तयार केल्या जात आहेत.

Loading...

डिसेंबर 2024 मधील एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनने भूतानमधील वादग्रस्त प्रदेशांमध्ये किमान 22 गावे आणि वस्त्या उभारल्या आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे यापैकी आठ गावे डोकलामच्या अत्यंत जवळ आहेत. तिथे काम चीनकडून केले जात आहे. भूतान आणि चीन यांच्यातील सीमावादाबाबत 1984 पासून चर्चा सुरू आहे.

दोन्ही देशांनी आतापर्यंत अनेक फेऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. मात्र, अजूनही सीमावादावर कोणत्याही तोडगा हा निघू शकला नाही. इतक्या बैठका होऊनही अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यातच चीनने गावे उभारण्यास सुरूवात केली. त्यांच्याकडून अनेक लोकवस्त्या तयार केल्या जात आहेत. दोन्ही देशांमधील तज्ज्ञ गटाची 16 वी बैठक 13 ते 15 ऑक्टोबर 2026६ दरम्यान थिम्पू येथे पार पडली. मात्र, पुन्हा चीनने पाय पसरण्यास सुरूवात केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us