भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्पची मोठी चाल, थेट ‘या’ देशाला धरले हाताशी, मोठी घोषणा

भारत आणि अमेरिकेत सध्या टॅरिफवरून तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकत आहेत. हेच नाही तर भारताने आपल्या अटी मान्य कराव्यात, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता भारतावर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेकडून वेगळा मार्ग स्वीकारण्यात आलाय.

भारताविरोधात डोनाल्ड ट्रम्पची मोठी चाल, थेट या देशाला धरले हाताशी, मोठी घोषणा
Donald Trump
| Updated on: Aug 13, 2025 | 9:07 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडालीये. भारताला मोठा झटका देण्यात आलाय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्याविरोधात भाष्य करताना दिसत आहेत. भारताच्या शेजारी देशांना इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यात आले नसून फक्त अमेरिकेने भारतावर टॅरिफ लागलाय. त्यांच्या टॅरिफच्या अटी मान्य करण्यासाठी भारतावर दबाव टाकला जातोय. मात्र, भारताने जर टॅरिफच्या अटी मान्य केल्या तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

पुढच्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर आहेत. सध्या भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्यात आले असून पुढच्या काही दिवसात अजून 25 टक्के आकारले जाईल. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट आहे. भारतीय बाजापेठेत अमेरिकेच्या कंपन्या पैशांची मोठी उलाढाल करतात. जर भारताने त्या कंपन्यांवर कारवाई केली तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेकडून पाकिस्तानच्या आडून भारताचा गेम करण्याचा डाव आहे. थेट पाकिस्तानने अमेरिकेच्या भूमीतून भारताला मोठी धमकी दिलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून हा देश उलट मार्गाने जाऊ लागला आहे. दहशतवादाला आळा घालणारा देश अमेरिकाकडून आता दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचे कौतुक केले जात आहे. अमेरिकेला पाकिस्तानचा पुळका आल्याचे बघायला मिळतंय. इस्लामाबादमध्ये झालेल्या पाकिस्तान-अमेरिका दहशतवाद विरोधी संवादानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात थेट पाकिस्तानचे काैतुक अमेरिकेकडून करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त निवेदन शेअर केले आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले.

अमेरिकेने पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. जगात शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी संघटनांना रोखण्यात पाकिस्तानने सातत्याने मिळवलेल्या यशाचे अमेरिकेने कौतुक केले. काही दिवसांपूर्वीच भारताच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामध्ये फक्त हिंदू लोकांना टार्गेट करण्यात आले आणि गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही अमेरिकेकडून दहशतवाद्याच्या मुद्दावर पाकिस्तानचे काैतुक करण्यात आले.