AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबत तणाव सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत…

भारत आणि अमेरिकामधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेकडून भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ हा लावण्यात आलाय. मात्र, भारताने अजूनही या टॅरिफच्या अटी मान्य केल्या नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर टॅरिफसाठी दबाव टाकला जातोय. त्यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतलाय.

अमेरिकेसोबत तणाव सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत...
Narendra Modi
| Updated on: Aug 13, 2025 | 7:42 AM
Share

टॅरिफच्या प्रश्नावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लादला आहे. ज्याचा परिणाम थेट भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारत देखील अमेरिकेच्या विरोधात कडक भूमिका घेत आहे. मात्र, अमेरिकेकडून पाकिस्तानच्या माध्यमातून भारताला मोठी धमकी दिली जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दाैऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळतंय. यावेळी व्यापार करार आणि टॅरिफच्या मुद्दावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दाैऱ्यावर असतील.  डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा देखील होईल. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा मुख्य उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणे आहे. नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होणार आहेत. टॅरिफच्या वादानंतर या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांची सर्वसाधारण सभा आहे.

या सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत असतील, संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या बाजूला पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक होईल.दोन्ही देशांमधील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी आणि शुल्काबाबत एक समान करार करण्यासाठी चर्चा होईल. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या या दाैऱ्याला अधिक महत्व प्राप्त आहे. कारण मागील काही दिवस भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून एक वाद सुरू झाल्याचे बघायला मिळतंय.

अमेरिकेकडून इतर देशांच्या तुलनेत भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आलाय. फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल चुकीची विधाने करताना दिसत आहेत. अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आलाय.  सध्या 25 टक्के लागू आहे, तर काही दिवसांत अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लागू केला जाईल. भारताने अमेरिकेच्या टॅरिफला विरोध केला आहे आणि तो अन्याय असल्याचे म्हटले आहे. मुळात म्हणजे भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो, हीच मोठी समस्या डोनाल्ड ट्रम्प यांची आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?