AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : तर भारताचं मोठं नुकसान झालं असतं, पाकिस्तानचा 1000 मिसाईल्सचा प्लॅन काय होता? मोदींची खळबळजनक माहिती!

नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती दिली आहे. पाकिस्तानने भारतावर 1000 मिसाईल्स आणि ड्रोन डागले होते, अशी माहिती मोदींनी दिली.

Operation Sindoor : तर भारताचं मोठं नुकसान झालं असतं, पाकिस्तानचा 1000 मिसाईल्सचा प्लॅन काय होता? मोदींची खळबळजनक माहिती!
naredndra modi
| Updated on: Jul 29, 2025 | 7:37 PM
Share

Narendra Modi On Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं? भारताने ऑपरेशन सिंदूर कसं पार पाडलं गेलं? याबाबत सांगितलं. तसेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानच्या एका मोठ्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पाकिस्तानने तब्बल 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता, असे मोदींनी सांगितले.

भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला

पाकिस्तानच्या या मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या कोणत्याही भागात पडले असते तर मोठा विध्वंस झाला असता असेही मोदी यांनी सांगितले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोन्सना नेस्तनाबूत केले. मी आज एक आकडा सांगणार आहे. हा आकडा ऐकून संपूर्ण देशाचा उर गर्वाने भरून येईल. 9 मे रोजी पाकिस्तानने जवळजवळ 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मोदींनी संसदेत दिली.

भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

तसेच, या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भगावर पडल्या असत्या तर तिथे मोठा विध्वंस झाला असता. पण या 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशातच हाणून पाडले, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली

पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसवरली गेली.  मी दुसऱ्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं. तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली. राजकारणात काही नवे पक्ष आहेत, त्यांना सत्तेचा अनुभव नाही. त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या तर समजू शकतो. पण काँग्रेसने सत्ता भोगली आहे. त्यांना शासनव्यवस्था माहीत आहे. त्यांना अनुभव आहे. तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं तरी त्याला स्वीकारत नाही, गृहमंत्री बोलले, संरक्षण मंत्री बोलले त्यांच्यावर विश्वास नाही, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था