AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 7 जिल्ह्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा, पुढील 24 तासात..

Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी वाढ झाली. काही भागात तर धरणे ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, 7 जिल्ह्यांमध्ये धो धो पावसाचा इशारा, पुढील 24 तासात..
Maharashtra Weather
| Updated on: Aug 02, 2026 | 6:59 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा हाहाकार बघायला मिळाला. सतत पाऊस सुरू आहे. आता राज्यात पावसाची उघडीप बघायला मिळेल. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मॉन्सूनची आस असलेला कमी दाबाचा पट्टावरील कमी दाब क्षेत्रापासून डेहरी, मालदा, माणिपूरपर्यंत सक्रिय झाला. गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. आज पुणे, रायगड, रत्नागिरी सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिम, गडचिरोली, गोदिंया, अमरावती, अकोला , वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. उर्वरित राज्यात देखील पाऊस कमी अधिक प्रमाणात असेल.

हवामान विभागाने नुकताच प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस होईल. याव्यतिरिक्त, 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज 2 ऑगस्ट रोजी पश्चिम राजस्थानमधील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथून एनडीआरएफच पथक दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या पथकामध्ये एक चार अधिकारी व 30 जवानांचा समावेश आहे, यात दोन महिला जवान देखील आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे निर्माण नद्या नाल्यांना आलेल्या परिस्थितीमुळे झालेल्या जीवित हानी वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांच्या सततच्या पावसामुळे अमळनेर, पारोळा तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू झाला असून तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. उजनी धरणातून 80 हजार तर वीर धरणातून 63 हजार इतक्या विसर्गाने भीमा नदी वाहणार असल्याने नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा