AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! अतिवृष्टी संकट, IMD ने..

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल.

Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! अतिवृष्टी संकट, IMD ने..
Maharashtra Weather
| Updated on: Aug 01, 2026 | 7:28 AM
Share

राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात धो धो पाऊस सुरू आहे. पावसाची रिपरिप पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असेल. आज भारतीय हवामान विभागाने नाशिक, पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. जून महिना कोरडा गेला. पण जुलै महिन्यात पाऊस धुव्वाधार झाला. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. मध्य प्रदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राकडे कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. जर पुरस्थिती निर्माण झाली. जर अजून काही दिवस पाऊस असाच राहिला तर अतिवृष्टीचे संकट आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पार्श्वूमीवर विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाने अतिमहत्वाच्या कामांशिवाय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.

पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. खडकवासला धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग 37 हजार क्यूसेक्स इतका करण्यात आला. दुपारी या वर्षातील सर्वाधिक 43500 क्यूसेक्स पाण्याचा करण्यात आला होता विसर्ग. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दारव्हा तालुक्यातील उचेगाव या गावातील उल्हास जाधव या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतामध्ये असलेल्या 70 बकऱ्या आणि कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच शेतात लागवड केलेले कपाशी, सोयाबीन तूर आणि हळद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर पाऊस झाला.

Follow Us
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ