AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पावसाचा हाहाकार! रेड अलर्ट, नद्यांना पूर, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा..

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. नदी, नाले, धरणे ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत.

राज्यात पावसाचा हाहाकार! रेड अलर्ट, नद्यांना पूर, अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा..
Maharashtra Weather
| Updated on: Jul 31, 2026 | 9:25 AM
Share

राज्यातील अनेक भागात पावसाने कहर केला. अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच रेड अलर्ट यवतमाळमध्ये भारतीय हवामान विभागाने दिला. अमरावतीमध्येही तूफान पाऊस सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुट्टी जाहीर केली. राज्यातील जवळपास जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी मोठा इशारा दिला. पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या सुट्टीचे परिपत्रक काढण्यात आले. यासोबतच नागरिकांनी यादरम्यान अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना केले जातंय. हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्याला पुढील तीन तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला.

हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 2498 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धुळे शहरात मुसळधार पाऊस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकी नदीला पूर आला आहे. अनेक दिवसांपासून कोरडेअसलेले वाकी नदीचे पात्र 24 तासात झालेल्या जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहत असल्याचा पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे जामनेर तालुक्यातील वाकी नदीला पूर आला आहे.

जळगाव जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार सलग दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या भागात पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून अनेक लहान-मोठे नदी-नालेही तुडुंब भरले आहेत.

जळगाव हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले 78 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला. मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल परिसरात नदी नाल्यांना पूर, सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पावसामुळे सातपुडा पर्वतरांगेत मुक्ताईनगरचं कुंड धरण भरलं कु-हा काकोडा येथील नदीला पूर आला. नदी काठावर न जाण्याचा जिल्हा प्रशासनाचा आव्हान आहे.

भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर बंधारा बुडाला पाण्याखाली गेला. चिंचपूर भागातील महाराष्ट्र-कर्नाटकचा संपर्क तुटला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पाण्याखाली गेल्याने महाराष्ट्र- कर्नाटकचा संपर्क तुटला आहे. चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण झाले ओव्हरफ्लो.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद