AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अतिमुळधार पाऊस, 24 तासात..

IMD Weather Update : राज्यात आज भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज पावसाचा ऑरेंज अलर्ट अनेक भागात जारी करण्यात आला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. सर्वदूर पाऊस कोसळताना दिसतोय.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अतिमुळधार पाऊस, 24 तासात..
IMD Weather Update
| Updated on: Jul 30, 2026 | 7:17 AM
Share

राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुणे घाटमाथा, सातारा, रायगड, जळगाव, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नशिक, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. छत्तीसगड आणि ओडिसा परिसरात वादळी प्रणाली सक्रिय आहे. ओडिसाच्या संभळपूरपासून 80 किलोमीटर वायव्येकडे डप डिप्रेशन सक्रिय आहे. राज्यात पुढील काही तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जून महिन्यात पाऊस कमी झाला. जवळपास जून महिना कोरडा गेला. पण जुलै महिन्यात त्याची पूर्ण भरपाई भरून निघाली. नांदेड शहरासह काही भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. हा पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच खळखळून भरून नाल्या वाहणार आहेत.

जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. या पावसामुळे सर्वत्र गारवा पडला. हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. दिवसभर अपेक्षित पाऊस न झाल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र, रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे धानासह खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. एल निनोमुळे मॉन्सूनला फटका बसणार असल्याचे सांगितले जात होते. जून महिना कोरडा गेल्याने टेन्शन अधिकच वाढले. त्यानंतर कुठे जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती