मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संतापले पुतिन, पाहा कुणाला दिला इशारा

| Updated on: Mar 23, 2024 | 9:17 PM

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी शुक्रवारी मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याला रानटी दहशतवादी कृत्य म्हटले आहे. यामागे युक्रेनचा सहभाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. युक्रेननेही दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यानंतर संतापले पुतिन, पाहा कुणाला दिला इशारा
Vladimir putin
Follow us on

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी मॉस्को कॉन्सर्ट हॉलवरील हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हटले आहे. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुतिन यांनी या हल्ल्यात युक्रेनचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. पुतिन म्हणाले की हल्ल्यानंतर दहशतवादी युक्रेनमध्ये पळून जाण्याचा विचार करत होते आणि त्यांनी तसा प्रयत्नही केला होता. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला. राष्ट्राला संबोधित करताना पुतिन म्हणाले: “मी आज तुमच्याशी त्या रक्तरंजित, रानटी दहशतवादी कृत्याबाबत बोलत आहे ज्यामध्ये डझनभर निरपराध आणि शांतताप्रिय लोक बळी पडले आहेत. मी 24 मार्च रोजी राष्ट्रीय शोक दिनाचे आवाहन करतो.

पुतिन म्हणाले की,  मॉस्को कॉन्सर्टच्या हल्लेखोरांनी युक्रेनला पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कीवने रशियाचा हा दावा फेटाळून लावला आहे. पुतिन यांनी मॉस्को कॉन्सर्ट हल्ल्यात युक्रेनचा सहभाग असल्याचा आरोप केला. या हल्ल्यात आतापर्यंत 115 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोकं जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांनी कीवच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. युक्रेनच्या काही लोकांनी त्यांना रशियाकडून सीमेपलीकडे नेण्याची तयारी केली आहे, असेही पुतीन म्हणाले.

युक्रेनने दहशतवाद्यांसाठी सुटकेचा मार्ग तयार केला – पुतिन

न्यूज एजन्सी रॉयटर्सने पुतिन यांच्या वक्तव्याचा हवाला देत म्हटले आहे की, “ते (हल्लेखोर) लपण्याच्या प्रयत्नात युक्रेनच्या दिशेने गेले. जिथे, युक्रेनने त्यांच्यासाठी राज्याची सीमा ओलांडण्यासाठी एक मार्ग तयार केला होता. पुतिन म्हणाले, “सर्व गुन्हेगार, आयोजक आणि जे या गुन्ह्यात सहभागी आहेत त्यांना शिक्षा होईल. ते कोणीही असोत आणि जो कोणी त्यांना मार्गदर्शन करत आहे, त्यांना देखील सोडले जाणार नाही. “हा हल्ला रशिया आणि आमच्या लोकांविरुद्ध आहे.

पुतिन यांच्या संबोधनानंतर लगेचच युक्रेनने मॉस्कोजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबारात आपला सहभाग नसल्याचे सांगितले. कीवच्या लष्करी गुप्तहेर संस्थेच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन रॉयटर्सने सांगितले की, “मॉस्कोजवळ शुक्रवारी झालेल्या गोळीबारात युक्रेनचा सहभाग नव्हता. आणि युक्रेनियन लिंकच्या सूचनांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.”