AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल, भारतावर काय परिणाम होणार?

जुनी लष्करी व्यवस्था ही पाकिस्तानी सेनेच्या तिन्ही दलांसोबत समन्वय साधण्यासाठी पुरेशी नव्हती, असे काही तज्ज्ञांकडून सांगितले जायचे. त्यामुळेच लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये समन्वय साधण्यासाठी हे बदल करण्यात आले असे सांगितले जाते.

आसिम मुनीर सर्वशक्तिमान! पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठा बदल, भारतावर काय परिणाम होणार?
asim munir and pakistanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 05, 2026 | 8:11 PM
Share

Pakistan Asim Munir : पाकिस्तान हे एक इस्लामिक राष्ट्र आहे. या देशात आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले. यातील काही पंतप्रधानांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले. या देशात लष्कराला खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर येथे लष्कराची बाजू जाणून घेतली जाते. दरम्यान, आता याच पाकिस्तान देशात लष्करी व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या हातात आणखी शक्ती आली आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीतही ते आता निर्णय घेऊ शकतील. या बदलामुळे पाकिस्तानातील लष्करी व्यवस्थेवर परिणाम पडणार आहे.

तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याची निर्णय

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत लष्कर, नौदल आणि हवाई दलाची जबाबदारी अगोदर वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे होती. तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी जॉइंट चीफ्सच्या अध्यक्षांकडे होती. नव्या बदलात आता हे पद संपण्यात आले आहे. तिन्ही दलांवर थेट कमांड आणि नियंत्रणाचे अधिकार त्यांच्या हातात नव्हते. जॉइंट चीफ्सचे अध्यक्षपद हटवून आता चिफ ऑफ डिफेन्स फोर्सेस हे पद तयार करण्यात आले आहे.

2025 मध्ये करण्यात आली घटनादुरुस्ती

जॉइंट चीफ्सच्या अध्यक्षपदाऐवजी ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ अर्थात CDF हे नवे पद निर्माण करण्यात आले आहे. 2025 मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून या पदाची निर्मिती करण्यात आली होती.

आसिम मुनीर यांच्याकडे आता चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसची जबाबदारी आली आहे. आता ते पाकिस्तानच्या तिन्ही सैन्यदलांच्या ऑपरेशनल कमांडबाबत थेट निर्णय घेऊ शकतात. म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील लष्करी कारवायांशी संबंधित निर्णयांमध्ये त्यांचे वर्चस्व वाढणार आहे.

अण्वस्त्र व्यवस्थेतही वाढणार प्रभाव

या बदलाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पाकिस्तानच्या अण्वस्त्र व्यवस्थेवरही CDF पदाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान ‘नॅशनल कमांड अथॉरिटी’चे प्रमुख असतात. ही संस्था देशाच्या अण्वस्त्र व्यवस्थेवर देखरेख ठेवते. आता नव्या निर्णयानुसार चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस हे या संस्थेचे उपाध्यक्ष होऊ शकतात. आता आसिम मुनीर पाकिस्तानच्या धोरणात्मक आणि अण्वस्त्रविषयक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

भारतावर नेमका काय परिणाम पडणार?

दरम्यान, जुनी लष्करी व्यवस्था ही पाकिस्तानी सेनेच्या तिन्ही दलांसोबत समन्वय साधण्यासाठी पुरेशी नव्हती, असे काही तज्ज्ञांकडून सांगितले जायचे. त्यामुळेच लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये समन्वय साधण्यासाठी हे बदल करण्यात आले असे सांगितले जाते. आता मुनीर यांच्याजवळ आणखी ताकद आल्याने भारताला आणखी सावध राहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानने भारतावर हल्ले केले होते. मुनीर यांच्याच काळात पाकिस्तानने हे हल्ले घडवून आणले होते. त्यामुळे मुनीर सर्वशक्तीमान झाल्यानंतर आता भविष्यात भारतावर काही परिणाम पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...