AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूएई, कतार, कुवेत, बहरीन, जॉर्डनमध्ये इराणचे हल्ले, युद्धाचा उडाला भडका, अमेरिकेने रात्रभर..

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला. इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले करण्यात आली. यासोबतच इराणने मोठी घोषणा करत थेट होर्मुज खाडीही बंद केली. यामुळे पुन्हा एकदा जग संकटात आहे.

यूएई, कतार, कुवेत, बहरीन, जॉर्डनमध्ये इराणचे हल्ले, युद्धाचा उडाला भडका, अमेरिकेने रात्रभर..
Missile attack
| Updated on: Jul 12, 2026 | 9:28 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने शनिवारी रात्रीपासून जे इराणवर हल्ल्याला सुरूवात केली ते रविवारी सकाळपर्यंत हल्ले सुरू होते. होर्मुज खाडी पार करणाऱ्या जहाजावर हल्ला केल्याने अमेरिकेकडून हे हल्ले करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर इराणकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली. इराणने जगाला ज्याची भीती होती, तोच निर्णय घेतला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडणार असल्याचे स्पष्ट आहे. कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना इराणनेही उत्तर दिले. ज्यामुळे पुन्हा एकदा आखाती देश संकटात आले. आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठा हल्ला इराणने केला.

कतारच्या सरकारने वाढलेला धोका बघता आपल्या सर्व नागरिकांना मोबाईलवर संदेश पाठवत सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या आणि आपत्कालीन अलर्टही जारी केला. हेच नाही तर खाडी देशांनी आपल्या नागरिकांना सूचना देत कोणत्याही महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या. कुवेत, बहरीन, जॉर्डन या देशात बॉम्बचे आवाज ऐकू आली आहेत.

त्यानंतर नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या. संयुक्त अरब अमिरातच्या रक्षा मंत्रालयाने पुष्टी केली की, युएईच्या काही भागात स्फोटाचे आवाज ऐकू आले. युएईवर इराणकडून मिसाईल टाकण्यात आली. त्यांच्या एअर सिस्टमने ते हवेतच नष्ट केले, ज्याचे आवाज ऐकू आली. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी इराणकडून युएई, कतार, कुवेत, जॉर्डन आणि बहरीन या देशांमध्ये क्षेपणास्त्र टाकण्यात आली. ज्यामुळे तणाव वाढला आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. दोन्ही देशात शांतता करार होत असतानाच अचानक युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे. इराणवर अमेरिकेने हल्ले करण्यास सुरूवात करताच इराणकडून थेट होर्मुज खाडी बंद करण्यात आली. दोन्ही देशातील तणाव कमी झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र, पुन्हा युद्ध भडकले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक