
चीनने आपल्या नागरिकांसाठी एक एडवायजरी जारी केली आहे. सध्या बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर बांग्लादेशातील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलतोय. या दरम्यान बांग्लादेशातील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी एक एडवायजरी जारी केली आहे. कुठल्याही परदेशी स्त्रीसोबत लग्न करण्याआधी संबंधित कायद्याच कठोरतेने पालन करा, असा इशारा बांग्लादेशातील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना दिला आहे. बांग्लादेशातील पुरुष किंवा महिलांशी लग्न जुळवण्यासाठी मॅचमेकिंग करणाऱ्या बेकायद एजेंट्सपासून सावध रहा, असं एडवायजरीमध्ये म्हटलं आहे.
चिनी नागरिकांनी बांग्लादेशात लग्न करण्याआधी दोनवेळा विचार करावा. परदेशी पत्नी विकत घेणं टाळा, असं दूतावासाने चिनी नागरिकांना सल्ला दिला आहे. बांग्लादेशात सध्या मोहम्मद यूनुस सरकार आणि सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. बांग्लादेशात म्यांमार सीमेवर मानवी मार्ग बनवण्याच्या योजनेवरुन सैन्य आणि सरकार आमने-सामने आहे. यूनुस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अमेरिकेसोबत गुप्तरित्या बांग्लादेश-म्यांमार सीमेवर एक मानवी मार्ग बनवण्यासाठी डील केली आहे. पण बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांना ही डील मान्य नाहीय.
चारही बाजूने घेरलं
बांग्लादेशात सतत विरोध प्रदर्शन सुरु आहे. विद्यार्थी संघटनांपासून विरोधी पक्षांपर्यंत मोहम्मद यूनुस यांना चारही बाजूने घेरलेलं आहे. प्रमुख विरोधी पक्ष या वर्षाच्या अखेरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. महफूज आसिफ आणि खलीलुर्रहमान सारख्या नेत्यांना सरकारबाहेर करण्यासाठी विरोधी पक्षाकडून आंदोलन सुरु आहे.
….आणि सत्तापालट झाला
मागच्यावर्षी पाच ऑगस्ट रोजी बांग्लादेशात सत्तापालट झाला. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. त्या भारतात आल्यानंतर मोहम्मद यूनुस यांना आठ ऑगस्टला बांग्लादेशच्या अंतरिम सरकारच प्रमुख बनवण्यात आलं.