जिओचा सर्वात स्वस्त नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, मिळणार अनेक फायदे, जाणून घ्या किंमत
जिओने 28 दिवसांच्या वैधतेसह स्वस्त नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना केवळ डेटाच नाही तर ओटीटी फायदे देखील देतो. ज्यांना कमी बजेटमध्ये डेटा आणि मनोरंजन दोन्ही हवे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

आजच्या डिजिटल युगात खूप स्पर्धा सुरू झाल्या आहेत. अशातच भारतात सर्वात प्रसिद्ध असलेल्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत फक्त 103 रुपये आहे. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना OTT मनोरंजन लाभांसह कमी वेळेत डेटा ॲक्सेस हवा आहे. हा प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो. चला जाणून घेऊया हा प्लॅन तुम्हाला किती GB डेटा देईल.
जिओचा 103 रुपयांचा फ्लेक्सिबल डेटा पॅक
103 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त तुम्हाला या प्लॅनमध्ये एक प्रीमियम ओटीटी सेवा देखील मिळते. वापरकर्ते हिंदी एंटरटेनमेंट, इंटरनॅशनल एंटरटेनमेंट आणि रिजनल कंटेंटमधून निवडू शकतात. रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला एक माय जिओ व्हाउचर मिळेल जे तुम्हाला तुमचे ओटीटी फायदे निवडण्याची परवानगी देते.
हिंदी मनोरंजन पर्यायांमध्ये Sony LIV, JioHotstar आणि ZEE5 यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय मनोरंजन पर्यायांमध्ये FanCode, JioHotstar, Discovery+ आणि Lionsgate Play यां ऑप्शनचा देखील समावेश आहे. रिजनल कंटेंट दर्शकांना जिओ हॉटस्टार, कांछा लंका, सन एनएक्सटी आणि Hoichoi सारखे ओटीटी पर्याय मिळतील.
अशा प्रकारे तुम्ही OTT ॲप्स ॲक्सेस करू शकता
रिडीम केल्यानंतर तुम्ही तुमच्या पसंतीच्या OTT सबस्क्रिप्शनचा आनंद 28 दिवसांसाठी घेऊ शकाल. JioTV ॲप सोनी LIV, ZEE5, डिस्कव्हरी+, लायन्सगेट प्ले, कांछा लंका, सन NXT, फॅनकोड आणि Hoichoi सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील प्रवेश देते.
या लाँचसह, जिओ परवडणाऱ्या डेटा ॲड-ऑन पॅकचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत करत आहे. कंपनीने फ्लेक्सिबल डेटा वापर आणि क्युरेटेड डिजिटल मनोरंजन ऑफरिंग एकत्रित केल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीनुसार कंटेंट निवडण्याची परवानगी मिळते. या नवीन पॅकच्या लाँचसह जिओच्या एकूण प्रीपेड प्लॅनची संख्या 110 पेक्षा जास्त झाली आहे.
एअरटेल एंटरटेनमेंट प्लॅन
एअरटेलचा सर्वात स्वस्त एंटरटेनमेंट प्लॅन 100 मध्ये 6 जीबी हाय-स्पीड डेटा देतो. 30 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन 20 हून अधिक ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस देतो.
