IPL Auction: पृथ्वी शॉ पुन्हा एकदा Unsold, पण…, आपल्या पोस्टने लक्ष घेतलं वेधून
आयपीएल 2026 मिनी लिलावाच्या पहिल्या टप्प्यातच पृथ्वी शॉला धक्का बसला. पहिल्या टॉप यादीत नाव असूनही त्याच्यासाठी कोणीच बोली लावली नाही. त्यामुळे त्याला या आयपीएल स्पर्धेतही खेळता येणार असंच वाटलं होतं. पण शेवटच्या टप्प्यात त्याच्यासाठी चमत्कार झाला असंच म्हणावं लागेल.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी संघांनी मोर्चेबांधणी केली आहे. खेळाडू रिटेन आणि रिलीज केल्यानंतर आवश्यक खेळाडूंसाठी मिनी लिलावात बोली लावली आणि त्यांना संघात घेतलं आहे. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात दिग्गज खेळाडूंची नावं होती. पण त्यापैकी बहुतांश खेळाडू हे अनसोल्ड राहिले. त्यात एक नाव होतं ते भारताचा आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉचं.. पृथ्वी शॉने 75 लाखांच्या बेस प्राईससह लिलावात उतरला होता. मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर त्याला मिनी लिलावात भाव मिळेल असं वाटलं होतं. पण त्याचं नशिब यंदाही फुटकं निघालं. त्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लिलावकर्ते कोण बोली लावते का? याकडे डोळे लावून होते. पण त्याच्यासाठी कोणीही पेडल वर केलं नाही. त्यामुळे अनसोल्ड प्लेयर म्हणून घोषणा झाली. दुसऱ्या फेरीत कदाचित त्याला कोणी विकत घेईल अशी आशा होती. पण तिथेही पदरी निराशा पडली. त्यामुळे यंदाही पृथ्वी शॉ आयपीएल खेळणार नाही, म्हणून निराश झाला होता. पण त्याला शेवटच्या क्षणी खरेदीदार मिळाला. एका अर्थाने त्याला देव पावला असंच म्हणावं लागेल.
पृथ्वी शॉ आयपीएल आणि भारतीय संघात पदार्पण करण्यासाठी धडपड करत आहे. नुकतंच त्याने मुंबई संघ सोडून महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीत त्याने 7 डावात 470 धावा केल्या. चंदिगडविरुद्ध 222 धावांची खेळी केली होती. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 36 चेंडूत 66 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पृथ्वी शॉ हा कॅप्ड प्लेयर असून फलंदाजांच्या श्रेणीत त्याचं नाव होतं. पण त्याच्यासाठी कोणीच इंटरेस्ट दाखवला नाही. अनसोल्ड राहिल्याने त्या एक भावूक करणारी पोस्ट केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने साईबाबांचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याने त्यावर लिहिलं आहे की, तुम्ही सगळं बघताय ना साई बाबा..
Prithvi Shaw posted this three minutes ago. Now that Delhi Capitals have picked him up for ₹75 lakh, he’ll probably delete it. 😭 pic.twitter.com/L8bba65quI
— INCUBUS (@klraahull) December 16, 2025

पृथ्वी शॉच्या पदरी वारंवार निराशा पडत असल्याने मानसिकरित्या खचल्याचं पोस्टमधून दिसत आहे. त्याने आपल्या भावना या पोस्टद्वारे व्यक्त केल्या होत्या. खरं त्याने बेस प्राईस कमी करून कोणी घेईल असा विचार केला असावा. त्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर रान पेटवलं होतं. पण काही वेळातच पृथ्वी शॉचं नशिब पालटलं. कारण त्याला बेस प्राईसवर दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलं आहे.
