तळ मजल्यावर जाळपोळ, 9 व्या मजल्यावर अडकलेले 28 पत्रकार, दंगलखोर जोरजोरात दरवाजा ठोकत होते, काळ आलेला पण…

काहीवेळाने बिल्डिंगच्या कॅन्टीनचा एक कर्मचारी आग विझवणाऱ्या शिडीचा वापर करुन खाली उतरला. खाली उतरताच जमावाने त्याला पकडून मारहाण सुरु केली. या घटनेनंतर कोणी शिडीवरुन खाली येण्याचा प्रयत्न केला नाही.

तळ मजल्यावर जाळपोळ, 9 व्या मजल्यावर अडकलेले 28 पत्रकार, दंगलखोर जोरजोरात दरवाजा ठोकत होते, काळ आलेला पण...
bangladesh protest
| Updated on: Dec 19, 2025 | 12:00 PM

बांग्लादेशात उस्मान हादीच्या मृत्यूनंतर दंगलखोरांनी अर्ध्या रात्री मिडिया ऑफिसेसवर हल्ले केले. दंगलखोरांनी बांग्लादेशातील इंग्रजी वर्तमानपत्र ‘द डेली स्टार’ च्या कार्यालयाला आग लावली. यावेळी इमारतीच्या छातावर अनेक पत्रकार जवळपास तीन तास अडकून पडलेले. या पत्रकारांसाठी मृत्यूसारखा हा अनुभव होता. ‘द डेली स्टार’च ऑफिस पूर्णपणे जळून खाक झालं आहे. दंगलखोरांनी बांग्लादेशातील दुसरं वर्तमानपत्र प्रथम आलोच्या कार्यालयाला सुद्धा आग लावली. हा हल्ला वर्तमानपत्राच्या कारवान बाजार ऑफिसमध्ये झाला. त्यानंतर प्रोथोम आलो बिल्डिंगमध्ये तोडफोड, जाळपोळ झाली. एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, बाहेरुन एक फोन कॉल आला. त्याने स्टाफला सतर्क केलं की, जमाव द डेली स्टार परिसराच्या दिशेने येत आहे.

न्यूजरुममधील स्टाफने सर्वात आधी खाली जाण्याचा प्रयत्न केला. पण तो पर्यंत जमाव इमारतीच्या तळ मजल्यापर्यंत पोहोचला होता. त्यांनी तिथे तोडफोड सुरु केली. त्यांनी तिथे जाळपोळ केली. ‘द डेली स्टार‘च्या ऑफिसमध्ये झालेल्या हिंसाचाराचा सर्व रिपोर्ट बांग्लादेशची वेबसाइट बीडीन्यूज24 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. रिपोर्टनुसार, आंदोलकांनी ऑफिसच्या तळमजल्यावर आग लावल्यानंतर धुराचे लोट बाहेर येत होते. म्हणून पत्रकार बाहेर पडू शकले नाहीत.

जमावाने त्याला पकडून मारहाण सुरु केली

या पत्रकाराचा एक ग्रुप 9 मजल्यावर गच्चीवर गेला. एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, तिथे 28 जण होते. काहीवेळाने बिल्डिंगच्या कॅन्टीनचा एक कर्मचारी आग विझवणाऱ्या शिडीचा वापर करुन खाली उतरला. खाली उतरताच जमावाने त्याला पकडून मारहाण सुरु केली. या घटनेनंतर कोणी शिडीवरुन खाली येण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर फायट फायटर्स आले व त्यांनी तळ मजल्यावर लागलेली आग नियंत्रणात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार लोक फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी इमारतीच्या छतावर गेले. खाली तोडफोड सुरु असल्याने पत्रकार खाली यायला तयार नव्हते. त्यावेळी पत्रकारांना वरती थांबणच जास्त योग्य वाटलं. गच्चीचा दरवाजा बंद होता.

फायर फायटर्सही घाबरले

फायर सर्विस स्टाफने पत्रकारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. आर्मीचे जवान बिल्डिंग बाहेर उभे आहेत असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. पण काही हल्लेखोर गच्चीजवळ आले. त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली. त्यावेळी गच्चीवर आलेले फायर फायटर्सही घाबरले. इमारतीत फसलेला डेली स्टारचा स्टाफ फायर-एग्जिट शिड्यांवरुन खाली उतरला. त्यांना इमारतीच्या मागच्या रस्त्याने बाहेर काढण्यात आलं.