AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पाठीत खुपसले खंजीर, ‘या’ दोन शत्रू देशांसोबत मिळून चक्क…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांच्या वागण्यावरून हे स्पष्ट होत आहे की, त्यांना भारतासोबतचे संबंध खराब होऊ द्यायचे नाहीत आणि भारताच्या विरोधात कुरघोड्या देखील करायच्या आहेत. आता त्यांनी भारताला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पाठीत खुपसले खंजीर, 'या' दोन शत्रू देशांसोबत मिळून चक्क...
Donald Trump
| Updated on: Sep 18, 2025 | 8:06 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. मात्र, एकीकडे भारताला धमक्या आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की, मी माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही वेळ फोनवर संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत आहेत आणि राहतील. आता अमेरिकेच्या भूमीवर भारताच्या दोन दुश्मनांची भेट होणार आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख देखील याच महिन्यात अमेरिकेचा दाैरा करणार असून ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जातंय.

मागच्या वेळी ते अमेरिकेच्या दाैऱ्यावर असताना त्यांनी अमेरिकेच्या भूमीवरून थेट भारताला परमाणू हल्ल्याची धमकी दिली होती. त्यानंतर सर्वांनी याचा निषेध केला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांना टार्गेट करत अमेरिकेतूनही टीका करण्यात आली. आता बांगलादेशच्या सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद यूनुस आणि पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांची भेट होणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे ही भेट इस्लामाबादमध्ये नाही तर अमेरिकेत होत आहे.

बांगलादेशच्या विदेश मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, यूनुस आणि शहबाज यांची भेट पुढच्या आठवड्यात न्यूयॉर्कमधील संमेलनात होणार आहे. शहबाज आणि यूनुस यांच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तानने अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकली आहेत. हेच नाही तर यूनुस देखील अमेरिकेच्या पुढे झुकल्याचे सांगितले जातंय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनात सहभागी होणार नसून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर होणार असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट म्हटले. यामुळे अजूनही संभ्रम आहे की, नरेंद्र मोदी या संमेलनात सहभागी होणार की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर. मात्र, भारतावरील दबाव वाढवण्यासाठी अमेरिका पाकिस्तान आणि बांगलादेशलासोबत घेताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...