AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान बिथरला! भारतालाच्या भितीने थेट सौदी अरेबियाकडे घातले लोटांगण, थेट करार..

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले.आता पाकिस्तानने थेट मोठा निर्णय घेतला आहे. भारताने किंवा इतर कोणत्या देशाने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो सौदी अरेबियावरही केल्याचे मानले जाईल.

पाकिस्तान बिथरला! भारतालाच्या भितीने थेट सौदी अरेबियाकडे घातले लोटांगण, थेट करार..
Saudi Arabia and Pakistan
| Updated on: Sep 18, 2025 | 7:29 AM
Share

पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर सही केल्या. पाकिस्तान भारताविरोधात लढण्यासाठी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. हेच नाही तर पाकिस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्धवस्थ केले. पाकिस्तानी लष्कर भारताच्या या हल्ल्यांना प्रतिउत्तर देऊ शकले नाही. रिपोर्टनुसार, दोन्ही देशांनी या कराराला स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अ‍ॅग्रीमेंट असे नाव दिले आहे. थोडक्यात काय तर जर एका देशावर हल्ला झाला तर दोन्ही देशांवर झाला असे मानले जाईल.

जर भारताने किंवा इतर कोणत्या देशाने पाकिस्तानवर हल्ला केला तर तो सौदी अरेबियावरही केल्याचे मानले जाईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सौदी अरेबिया दाैऱ्यावर होते आणि त्यांनीच हा करार केला. शाहबाज शरीफ हे रियाधला पोहोचले होते. अल-यामामा पॅलेसमध्ये क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी या करारावर सह्या केल्या.

जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा करार दोन्ही देशांमधील जवळजवळ आठ दशकांच्या भागीदारीवर आधारित आहे. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, हा करार केवळ द्विपक्षीय सुरक्षा संबंध अधिक दृढ करण्यासाठी नाही तर त्यांचा उद्देश प्रादेशिक आणि जागतिक शांततेत योगदान देणे आहे. शाहबाज शरीफ यांच्या या दाैऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या, शेवटी त्यांनी करारवर सह्या केल्या आहेत.

मागील काही वर्षांत पाकिस्तानच्या भारताच्या विरोधातील कुरापती वाढल्या आहेत. मात्र, भारत आता थेट सडेतोड उत्तर पाकिस्तानला देताना दिसतोय. घरात घुसून मारणारा हा नवा भारत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदरच स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्याला भारताने थेट उत्तर देत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. हेच नाही तर पाकिस्तानातील जैशच्या कमांडरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. त्यामध्ये त्याने मोठा दावा मसूद अझहरबद्दल केलाय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...