Explainer : तो 17 मिनिटांचा कॉल, अंकल या एका शब्दामुळे सरकार पडलं, थायलंडमध्ये काय घडलं?
पायंतोगर्टान शिनावात्रा यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले. अलिकडेच त्यांचा एक फोन कॉल समोर आला होता. या फोन कॉलमध्ये त्यांनी कंबोडियाच्या सिनेटच्या अध्यक्षांचा अंकल असा उल्लेख केला होता.

Thailand Cambodia Border Conflict : गेल्या काही महिन्यांत थायलँडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. या देशात 5 सप्टेंबर रोजी नव्या पंतप्रधानांची निवड करण्यात आली. आता थायलंडचा कारभार भूमजैथाई पक्षाचे अनुतिन चार्नविराकुल यांच्याकडे आला आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. सध्या अनुतिन यांच्याकडे थायलंडच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी आली असली तरी गेल्या काही दिवसांत या देशामध्ये बरंच काही घडलंय. एका 17 मिनिटांच्या कॉलने या देशातलं सरकार पडलं आहे. अंकल या एका शब्दामुळे पायंतोगर्टान शिनावात्रा यांना पंतप्रधानपदाची खूर्ची खाली करावी लागली होती. हा 17 मिनिटांचा कॉल नेमका काय होता? अंकल या एका शब्दामुळे नेमकं काय राजकारण रंगलं? हे जाणऊन घेऊ या… ...
