AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीकडे जगाच्या नजरा, 11 सप्टेंबरला महत्वाची बैठक, नरेंद्र मोदी आणि पुतिन दोघेही..

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध कायमच चांगले राहिले आहेत. ज्यावेळी भारताला रशियाची गरज असते, त्यावेळी रशिया भारताच्या मदतीला धावून आला. त्यातच पुन्हा एकदा पुतिन आणि मोदी यांची भेट होतंय.

दिल्लीकडे जगाच्या नजरा, 11 सप्टेंबरला महत्वाची बैठक, नरेंद्र मोदी आणि पुतिन दोघेही..
Narendra Modi and Vladimir Putin
| Updated on: Sep 08, 2026 | 4:35 PM
Share

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री काही नवी नाही. ज्या ज्यावेळी भारताला मदतीची गरज पडली, त्या प्रत्येकवेळी भारताच्या मदतीला धावून रशिया आला. इराण आणि अमेरिका युद्धात कच्च्या तेलाची मोठी समस्या होती. त्यावेळी भारताच्या मदतीला धावून रशिया आला. भारताला हवे तेवढे कच्चे तेल आम्ही देणार असल्याचे रशियाने जाहीर केले. भारत हा रशियाकडून कच्चे तेल घेत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. नवी दिल्लीत 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान 18 ब्रिक्स शिखर समेंलनाचे आयोजन केले जाणार आहे. त्याच्या बरोबर अगोदर 11 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या उच्चस्तरीय व्दिपक्षीय संवाद होईल. क्रेमलिन प्रवक्ते दमित्री पेसकोव यांनी म्हटले की, भारतासोबतचे संबंध आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत.

पेसकोव यांनी म्हटले की, भारत आणि रशिया यांच्यात मोठा व्यापार आहे. सुरक्षा, ऊर्जा, परिवहन आणि विज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांना काम करायचे आहे. दोन्ही नेते सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी आणि पुतिन यांच्या बैठकीत व्दिपक्षीय संबंधांवर चर्चा होईल. भारतीय कंपन्यांना भारतात गुंतवणूक करायची आहे.

त्यांना रशियाच्या मार्केटमध्ये रस आहे. भारतीय बाजारात उत्पादन वाढवण्यासाठी अनेक रशियन कंपन्या इच्छुक आहेत. काही महिन्यांपूर्वीच पुतिन हे भारत दाैऱ्यावर आले होते. भारतावर अमेरिकेने मोठा टॅरिफ लावल्यानंतर तब्बल सात मंत्र्यांना आपल्यासोबत घेऊन पुतिन भारत दाैऱ्यावर आले होते. यादरम्यान काही अत्यंत महत्वाचे करारही पुतिन यांनी केले. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर रशियाची बाजारपेठ खुली केली.

अनेक महत्वपूर्ण करार केले. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेने काही निर्बंध रशियावर लादली. रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशावरही कारवाई अमेरिकेकडून करण्यात आली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ अमेरिकेने लादला. त्यावेळी पुतिन भारताचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढे आले. भारतासोबत त्यांनी मोठे करार केले.

Follow Us
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं