AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाबहार बंदर ठरतंय तारणहार, इराणच्या मदतीला भारतच, थेट मोठा धक्का..

इराण आणि अमेरिका युद्ध थांबून मार्ग काढण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अजून तरी मध्यस्थी करणाऱ्या देशांना फार काही यश मिळत नाहीये. होर्मुज खाडी दिवसेंदिवस स्थिती अधिक बिकड आणि गंभीर होताना दिसत आहे.

चाबहार बंदर ठरतंय तारणहार, इराणच्या मदतीला भारतच, थेट मोठा धक्का..
Chabahar Port
| Updated on: Apr 16, 2026 | 11:38 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध एका वेगळ्या स्तरावर पोहोचले आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेकडून नाकेबंदी करण्यात आली. अमेरिकेने केलेल्या या नाकेबंदीमुळे इराण जैरीस आले. इराणच्या बंदरातून एकही जहाज पुढे जाऊ शकत नाहीये. काही जहाजांनी निघण्याचा प्रयत्नही केला पण अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर त्यांना परतावे लागले. यादरम्यान आता इराणकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय उरला आहे. चाबहार बंदर हा एकच पर्याय इराणकडे आहे. इराणच्या मेहर वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेने सोमवारी नाकेबंदी जाहीर केली. ज्यानंतर इराणवर थेट परिणाम होताना दिसतोय. मध्य आशियासोबतच्या व्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या चाबहार बंदरात यापूर्वी भारताने कोट्यावधीची गुंतवणूक केली आहे. भारताने इराणच्या या बंदराचा पूर्ण विकास केला. आता वाईट काळात हेच बंदर इराणच्या मदतीला येताना दिसत आहे. विशेष म्हणजे होर्मुज खाडीपासून हे बंदर अत्यंत दूर आहे.

चाबहार बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील ग्वादर बंदराच्या अगदी जवळ आहे. इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून संयुक्त अरब अमिरातीला मोठा धक्का दिला आहे. संयुक्त अरब अमिरातीने हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमार्फत सादर केला होता, जो संघटनेने स्वीकारला होता. इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, संयुक्त अरब अमिरातीच्या प्रस्तावाला कोणताही कायदेशीर आधार नाही.

अमेरिका आणि इस्रायलनंतर, इराणनेच संयुक्त अरब अमिरातीवर सर्वाधिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. संयुक्त अरब अमिराती होर्मुजची खाडी खुली करण्याची आणि टोल थांबवण्याची मागणी करत आहे. मात्र, इराणकडून स्पष्टपणे त्यांची कानउघडणी करण्यात आली.

पाकिस्तानमधील इराणच्या राजदूतांनी मंगळवारी होर्मुजच्या खाडीतील नाकेबंदीविषयी बोलताना म्हटले की, एक अविचारी चूक. कदाचित सन्मानाने माघार घेण्यासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी असावी. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराण कोणत्याही पद्धतीने हार मानताना दिसत नाहीये. इराण इतक्या जास्त घातकप्रमाणे प्रतिउत्तर देईल, याचा विचारही कोणी केला नव्हता. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्यापूर्वी अत्यंत मोठी धमकी इराणला अमेरिकेने दिली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...