AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! अमेरिकेचा H-1B व्हिसाचा निर्णय फसला, चीनने टाकला मोठा डाव, आता थेट..

H-1B rule changes : अमेरिका मागील काही दिवसांपासून भारतावर दबाब टाकण्याचे काम करत आहे. त्यामध्येच आता त्यांनी H-1B व्हिसाबद्दल अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा निर्णय फसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

जग हादरलं! अमेरिकेचा H-1B व्हिसाचा निर्णय फसला, चीनने टाकला मोठा डाव, आता थेट..
H-1B visa
| Updated on: Sep 22, 2025 | 7:28 AM
Share

अमेरिकेने भारतासह दुसऱ्याही काही देशांना कोडींत पकडण्यासाठी थेट H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारत धक्का दिला. अमेरिकेतील कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना विदेशातून अमेरिकेत काम करायला आणायचे असेल H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये मोजावे लागतील. हा अत्यंत मोठा धक्काच म्हणावा लागेल. मुळात म्हणजे अमेरिका एका मागून एक मोठे धक्के हे भारताला देत आहे. सर्वात अगोदर त्यांनी मोठा टॅरिफ लावला. त्यानंतर व्यापारासाठी भारताला महत्वाच्या असणाऱ्या बंदराचा ताबा काढून घेतला आणि आता थेट व्हिसावर इतकी मोठी शुल्क आकारली.

अमेरिकेत H-1B व्हिसावर जाऊन नोकऱ्या करणाऱ्यावर भारतीय जास्त आहेत. काहीही करून अमेरिकेला भारताकडून त्यांच्या अटी मान्य करून घ्यायच्या आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी. मग आम्ही त्यांच्यावरील टॅरिफ रद्द करू अशी भूमिका त्यांनी अगोदरच घेतली आहे. मात्र, भारत त्यांच्या कोणत्याही अटी मान्य करत नाहीये. आता त्यांचा हा व्हिसाचा डाव टाकला. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतरच भारत आणि चीनतील मैत्री वाढल्याचे बघायला मिळाले.

आता अमेरिकेने घेतलेल्या H-1B व्हिसाच्या निर्णयानंतर चीन देखील मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. चीनने आता नवीन K व्हिसा सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. विज्ञान, उद्योग, टेक या क्षेत्रातील लोकांना आकर्षित करण्यासाठी चीनने या K व्हिसाची घोषणा केली आहे. चीनने एकप्रकारे अमेरिकेलाच हा मोठा धक्का दिला आहे. 1 ऑॅक्टोबर 2025 पासून चीन हे K व्हिसा लोकांना देणार आहे. K व्हिसाठी उच्चशिक्षित लोक अर्ज करू शकतात.

भारतातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे टेन्शन वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हा एकप्रकारे मोठा दिलासाच नक्की म्हणाला लागेल. चीनच्या या K व्हिसामध्ये 12 विभाग तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या व्हिसासाठी तुम्हाला चीनच्या कंपनीची ऑफर असण्याची काही गरज नाही. थोडक्यात काय तर भारतासाठी अमेरिकेने दरवाजे नोकऱ्यांसाठी बंद केली असली तरीही लगेचच निर्णय घेत चीनने भारतीय नोकरदारांसाठी आपली दरवाजे उघडली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...