जगात खळबळ! ट्रम्प सरकारने थेट केली धक्कादायक आकडेवारी जारी, H-1B व्हिसाच्या वादात अमेरिकेने..
H-1B Visa Disputes : H-1B व्हिसाच्या निर्णयानंतर जगात खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. ट्रम्प सरकार आता थेट मोठा खुलासा करत जगाला धक्का देणारी आकडेवारी जारी केली आहे. त्यांनी H-1B व्हिसाच्या नियमात बदल करण्यामागे कारण सांगितले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेतला आणि एकच खळबळ उडाली. H-1B व्हिसावर तब्बल 88 लाख रूपये शुल्क आकारण्यात आले. H-1B व्हिसाचा वापर जास्त करून टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होतो. विशेष म्हणजे भारतीय नागरिक जास्त करून याच व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करतात. आता H-1B व्हिसाबद्दल अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाबद्दल हैराण करणारा खुलासा करण्यात आला. H-1B व्हिसामुळे अमेरिकन लोकांच्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्याचा दावा करण्यात आला. फक्त हेच नाही तर थेट आकडेवारीही जाहीर करण्यात आली. अमेरिकेच्या दाव्यानुसार, H-1B व्हिसामुळे अमेरिकन लोकांच्या मोठ्या संख्येने नोकऱ्या गेल्या आहेत.
व्हाइट हाऊसने म्हटले की, एक कंपनीला 5189 H-1B व्हिसा मिळाले आणि त्यांनी 16000 अमेरिकन कर्मचाऱ्यांना कामाहून घरी पाठवले त्यांच्या नोकऱ्या काढून घेतल्या. अजून एका कंपनीला 1698 H-1B व्हिसा मिळाले, त्यानंतर त्या कंपनीने 2400 अमेरिकन लोकांना कामावरून काढले. व्हाईट हाऊसने म्हटले की, अजून एका कंपनीने 2022 पासून 27000 अमेरिकन लोकांना नोकरीवरून काढले. चाैथ्या कंपनीने 1000 लोकांना नोकरीवरून काढले आणि विदेशी लोकांना घेतले.
व्हाईट हाऊसने स्पष्ट म्हटले की, आम्ही H-1B व्हिसाचा निर्णय हा फक्त आणि फक्त अमेरिकेच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. या नवीन नियमानंतर भारतीय नागरिक चिंतेत आहेत. हेच नाही तर भारताला अडकवण्यासाठीच अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. टॅरिफनंतर H-1B व्हिसाचा मोठा धक्का अमेरिकेने भारताला दिला आहे. काल भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्याचे बघायला मिळाले.
लोकांनी मोठ्या संख्येने अमेरिकेत जाण्यासाठी विमानांची तिकिटे बूक केली. भारत हा अमेरिकेच्या अटी मान्य करत नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळत आहे. अजून भारतावर नेमके काय निर्बंध डोनाल्ड ट्रम्प हे लादतात, याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. हेच नाही तर भारतासोबतच ब्राझीलवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावला त्यानंतर ब्राझीलने स्पष्ट केले की, आमचा आणि अमेरिकेचा काहीच संबंध नाही.
