China : चीनमध्ये उईगर मुस्लिमांचे हाल, संयुक्त राष्ट्राने अत्याचाराच पाढाच वाचला, चीनने आरोप फेटाळले

चीनने (China) उईगर (Uyghur) आणि इतर वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप आहे. याबाबत बुधवारी एक अहवाल युनायटेड नेशन्सकडून (United Nations) सादर करण्यात आला आहे.

China : चीनमध्ये उईगर मुस्लिमांचे हाल, संयुक्त राष्ट्राने अत्याचाराच पाढाच वाचला, चीनने आरोप फेटाळले
अजय देशपांडे

|

Sep 01, 2022 | 8:55 AM

चीनने (China) उईगर (Uyghur) आणि इतर वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप आहे. याबाबत बुधवारी एक अहवाल युनायटेड नेशन्सकडून (United Nations) सादर करण्यात आला आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर उईगर आणि इतर वंशाच्या अल्पसंख्यांक लोकांवर सुरू असलेल्या अत्याचारावरून संयुक्त राष्ट्र संघटनेने चीनला खडेबोल सुनावले आहेत. मात्र दुसरीकडे चीनकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तसेच हा अहवाल मागे घेण्याची मागणी देखील चीनच्या राजदुतांकडून करण्यात आली आहे.याबाबत बोलताना चीनने म्हटले आहे की, आजून आम्ही हा अहवाल पाहिला नाही. मात्र आम्ही या अहवालाचा विरोध करतो. अशाप्रकारच्या अहवालामुळे कोणाचेही भले होणार नाही.

अहवालात काय म्हटले?

चीनमध्ये उईगर मुस्लीम समाज आणि इतर अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचर सुरू आहेत. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली सुरू आहे. चीनची ही कृती म्हणजे मूलभूत मानवी अधिकारांचे उल्लंघन असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. चीनने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले असून, हा अहवाल मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. परंतु चीनची ही मागणी संयुक्त राष्ट्र संघाचे मानवाधिकार प्रमुख मिशेल बाचेलेट यांनी फेटाळून लावली आहे.

अहवाल कशाच्या आधारावर?

संयुक्त राष्ट्र संघाचा हा अहवाल चीनच्या शिनजियांग प्रांतातून पळून आलेल्या उईगर मुस्लिमांसोबत केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर बनवण्यात आला आहे. उईगर मुस्लिमांसोबत इतर अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना नजर कैदेत ठेवले जात असून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार देखील होत असल्याची शक्यता आहे, असं या अहवालामध्ये म्हटलं आहे.

चीनने आरोप फेटाळले

दरम्यान दुसरीकडे मात्र संयुक्त राष्ट्रसंघाचा हा अहवाल मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे. तसेच हा अहवाल मागे घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र संयुक्त राष्ट्राने चीनची ही मागणी फेटाळून लावली आहे. आम्ही हा अहवाल अजून पाहिला नाही, मात्र या अहवालामुळे कोणाचेही भले होणार नसल्याचे चीनने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें