AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी तरुणींपासून दूर राहा… चीनचा तडकाफडकी आदेश जारी; देशवासियांना का केलं अलर्ट?

चीनने आपल्या नागरिकांना पाकिस्तानी किंवा परदेशी मुलींशी लग्न न करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे आर्थिक आणि कायदेशीर अडचणी येऊ शकतात, असे म्हटले आहे. फसवणूक आणि बेकायदेशीर विवाहांना आळा घालण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला. एजंट्सच्या माध्यमातून होणारे विवाह धोकादायक असून, शिंटियन काऊंटी पोलिसांनी याबाबत नागरिकांना सतर्क केले आहे.

पाकिस्तानी तरुणींपासून दूर राहा... चीनचा तडकाफडकी आदेश जारी; देशवासियांना का केलं अलर्ट?
Chinese CitizensImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 15, 2026 | 11:34 PM
Share

चीनने त्यांच्या देशातील नागरिकांना पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाच्या मुलींशी लग्न न करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानी वा इतर देशांच्या मुलींशी लग्न केल्यास तुम्हाला आर्थिक आणि कायदेशीर संकटांचा सामना करावा लागू शकतो, असं चीनने म्हटलं आहे. चिनी तरूणांमध्ये पाकिस्तानी मुलींशी लग्न करण्याची क्रेझ वाढलेली असतानाच चीनने हा इशारा दिला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, चीनच्या स्थानिय प्रांत शिंटियन काऊंटीच्या पोलिसांनी हा इशारा जारी केला आहे.

चीनचे नागरिक पाकिस्तान आणि इतर देशातील मुलींशी लग्न करत असल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सर्रासपणे घडताना दिसत आहेत. या नात्यात वास्तविकपणे भावनिक आधार फार कमी असतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतो. तसेच कायदेशीर प्रकरणात तुम्ही अडकू शकता, असं पोलिसांनी या अलर्टमध्ये म्हटलं आहे. दलालांच्या संपर्कात येऊन जे लोक लग्नाच्या गाठी बांधत आहेत, त्यांचं नुकसान ठरलेलं आहे, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये लग्न लावून देणारे असे असंख्य एजंट आहेत.

पोलिसांचा इशारा काय आहे?

एका रिपोर्टनुसार, चिनी सरकारच्या आदेशानंतर आंतरराष्ट्रीय विवाहाबाबत प्रांत स्तरावर हा इशारा देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंटियन काऊंटी प्रांताच्या पोलिसांनी हा इशारा दिला आहे. यापूर्वी हेनान प्रांतातील पोलिसांनी सामान्य नागरिकांना हा इशारा दिला होता.

इशाऱ्यामधील 3 मुख्य गोष्टी-

1. बेकायदेशीर लग्नाची पोलिसांना माहिती मिळाली तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

2. बाहेरच्या देशातून महिला किंवा मुलगी आली तर इमिग्रेशनचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

3. लग्नानंतर मुलं ताब्यात घेतल्या जातील. चीनमध्ये लाभासाठी आंतरराष्ट्रीय विवाह करण्यास मनाई आहे.

केवळ खरं प्रेम म्हणूनच लग्न करा आणि इमिग्रेशन नियमांचं पालन करा, असं आवाहन शिंटियन पोलिसांनी केलं आहे.

इशारा महत्त्वाचा का?

चीनच्या सांख्यिकी विभागाच्या मते, वर्ष 2018मध्ये 120 पाकिस्तानी मुलींनी चीनच्या मुलांशी लग्न केलं होतं. 2020मध्ये ही संख्या वाढून 600 झाली. त्यानंतर चिनी सरकारने पाकिस्तानी मुलींच्या लग्नाचा डेटा जाहीर करणं बंद केलं. याच वर्षी पाकिस्तानने एका चिनी तरुणाला अटक केली होती. एका पाकिस्तानी मुलीला ट्रॅपमध्ये अडकवून तिला पळवून चीनला नेण्याचा त्याचा प्लान असल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याला या मुलीशी विवाह करायचा होता.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक