Operation Sindoor : पाकला तुम्ही दिलेली शस्त्र कुचकामी कशी निघाली? चिनी प्रवक्त्याचं अजब उत्तर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी चिनी माल फुस्स झाला. पाकिस्तानने चीनकडून त्यांना मिळालेली शस्त्र, मिसाइल्स भारतावर डागली. पण ही शस्त्र कुचकामी ठरली. आता चिनी प्रवक्त्याला या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्याने एकदम अजब उत्तर दिलं आहे.

Operation Sindoor : पाकला तुम्ही दिलेली शस्त्र कुचकामी कशी निघाली? चिनी प्रवक्त्याचं अजब उत्तर
PL-15 E
| Updated on: May 30, 2025 | 1:05 PM

ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने चीनकडून त्यांना मिळालेली शस्त्र, मिसाइल्स भारतावर डागली. यातले काही मिसाइल्स टार्गेटपर्यंत पोहोचून फुस्स झाली. फुटलेच नाही. चीनच PL-15E हे रडार संचलित बियॉन्ड विजुअल रेंज मिसाइल असच एक शस्त्र आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने या PL-15E मिसाइलच्या अशाच अक्षरक्ष: चिंधड्या उडवल्या. चीनला हे सत्य पचवण खूप जड जातय. त्यांचं हे कथित सुपर ब्रांड मिसाइल फेल गेलं. चिनी सैन्याला नुकतच भारत-पाकिस्तान संघर्षातील त्यांच्या शस्त्रांच्या प्रदर्शनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.

चिनी प्रवक्त्याने या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं. त्याला काही सूचलं नाही, तेव्हा त्याने डिप्लोमसीच ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. या संघर्षाला 20 दिवस झालेत. दिवसागणिक चिनी शस्त्र किती निष्प्रभावी ठरलीत, त्याची माहिती समोर येत आहे. चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीनियर कर्नल झांग जियाओगांग यांना पत्रकारांनी PL-15E मिसाइल बद्दल विचारलं. चीन PL-15E मिसाइल आपलं अत्याधुनिक रॉकेट असल्याच सांगतो. पण या Advance रॉकेटचा पाकिस्तानने भारताविरोधात वापर केला, तेव्हा ते फुटलच नाही.

मिसाइल का फुटलं नाही? त्याचं उत्तर नाही

भारतीय अधिकाऱ्यांना एक संपूर्ण PL-15E मिसाइल मिळालं. 9 मे 2025 रोजी पंजाबच्या होशियारपूरमध्ये हे मिसाइल मिळालं. पाकिस्तानने या मिसाइलने भारतावर हल्ला केला होता. या मिसाइलबद्दल चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सीनियर कर्नल झांग जियाओगांग यांना प्रश्न विचारला. त्यावर ते एवढच बोलले, तुम्ही ज्या मिसाइलचा उल्लेख करताय, ते निर्यात केलं जाणारं शस्त्र आहे. हे मिसाइल देश-विदेशात अनेक संरक्षण प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे. चीनचं हे सर्वात अत्याधुनिक मिसाइल का फुटलं नाही? त्याचं उत्तर मात्र झांग देऊ शकले नाहीत.

काय खास आहे PL-15E मिसाइलमध्ये?

PL-15E हे एक लांब पल्ल्याच हवेतून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. हे चीनच्या 607 इंस्टीट्यूटने विकसित केलं आहे. हे मिसाइल चायना एयरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉरर्पोशन (CASIC) बनवते. हे रडार संचलित मिसाइल असल्याचा चीनचा दावा आहे. यात डुअल-पल्स सॉलिड-प्रोपेलेंट रॉकेट मोटर आहे, ज्यामुळे याला Mach 5 पेक्षा जास्त स्पीड आणि 145 किलोमीटरची रेंज मिळते.

प्रश्न एक उत्तर दुसरच

JF-17 ब्लॉक III आणि J-10CE या पाकिस्तानी फायटर जेट्सवर ही मिसाइल बसवण्यात आली आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी J-10C ने भारतावर हल्ला करण्यात आला. पण वेळेला हा चिनी माल फुटलाच नाही. कर्नल झांग मिसाइलच्या परफॉर्मन्सबद्दल विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान असे शेजारी आहेत, ज्यांना वेगळं केलं जाऊ शकत नाही. दोन्ही बाजू शांत आणि संयमित राहतील अशी अपेक्षा आहे”