AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचं नाक दाबलं, या देशाने दुतावासाचा डिझेल पुरवठा रोखला, ट्रम्प यांना मोठा झटका

Donald Trump : अमेरिकन सरकारची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि क्यूबा यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमध्ये संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचं नाक दाबलं, या देशाने दुतावासाचा डिझेल पुरवठा रोखला, ट्रम्प यांना मोठा झटका
US vs CubaImage Credit source: Google
| Updated on: Mar 21, 2026 | 3:31 PM
Share

अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू आहे, या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये. अशातच आता अमेरिकन सरकाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि क्यूबा यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. अलीकडेच क्यूबा सरकारने हवाना येथील अमेरिकन दूतावासाला त्यांच्या जनरेटरसाठी डिझेल आयात करण्याची परवानगी नाकारली आहे. ट्रम्प सरकार क्यूबाची इंधनवरून नाकेबंदी केली असल्याने क्यूबा सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

क्यूबाने दुतावासाला होणारा डिझेल पुरवठा रोखल्यामुळे आता अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. डिझेलच्या कमतरतेमुळे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून हवाना येथील दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमेरिकेतली क्यूबाच्या दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची मागणीही ट्रम्प प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे, यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाण्याची शक्यता आहे.

क्यूबा-अमेरिकेत तेलावरून तणाव

क्यूबामधील ऊर्जा संकट आधीपासूनच गंभीर आहे. कारण अमेरिकेने वेनेझुएलाकडून क्यूबाला होणारा तेलपुरवठा रोखल्यानंतर क्यूबाला मोठा धक्का बसला आहे. क्यूबा हा वेनेझुएलाच्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार होता. तसेच अमेरिकेने क्यूबाला तेल विकणाऱ्या इतर देशांवरही दबाव आणला आहे आणि टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

क्यूबामध्ये वीजसंकट वाढले

अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका क्यूबाच्या सामान्य जनतेला बसताना पहायला मिळत आहे. या देशात वीज संकट तीव्र होत आहे, ज्यामुळे अनेक उद्योगांनी मोठा फटका बसला आहे. क्यूबातील रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. क्यूबा नैसर्गिक वायू, सौर ऊर्जा आणि देशांतर्गत तेलाच्या मदतीने वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती मागणी पूर्ण करण्यासाठी अपुरी पडत आहे.

क्यूबामध्ये सत्तापालट करण्यासाठी अमेरिकेचा दबाव

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प क्यूबामध्ये राजकीय बदलांसाठी दबाव टाकत आहेत. अमेरिकेने अनेकदा क्यूबावर हल्ला करण्याची भाषा देखील केली आहे. इराणविरुद्धचे युद्ध संपल्यानंतर अमेरिका आपला मोर्चा क्यूबाकडे वळवणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात या दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळू शकतो.

Follow Us
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण