
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर पाकिस्तानात हालचाली वाढलेल्या दिसत आहेत. या ब्लास्टनंतर पाकिस्तानी सैन्य आणि सरकार अलर्ट मोडवर आहे. तिथल्या सोशल मीडिया युजर्समध्ये भिती आहे. पाकिस्तानातील सोशल मीाडिया युजर्स भारतात झालेल्या स्फोटाबद्दल विचारुन नरेटिव सेट करत आहेत. अधिकृतरित्या पाकिस्तान सरकारने दिल्ली ब्लास्टबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेला नाही. पाकिस्तानी सैन्याने दिल्ली ब्लास्टनंतर नोटाम जारी केला आहे. नोटामच्या माध्यमातून पाकिस्तानी पायदळ, हवाई दल आणि नौदलाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे. नोटाम जारी झाल्यानंतर तणावपूर्ण सीमा क्षेत्रात हवाई प्रवासावर प्रतिबंध येतात. सुरक्षा प्रोटोकॉल वाढतात.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार सोमवारी रात्री इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सैन्य प्रमुख आसिम मुनीर यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीबद्दल पाकिस्तानी मीडियाला जास्त माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानच्या मनात भिती कसली?
दिल्ली स्फोटाचा तपास सुरु आहे. पाकिस्तानमध्ये मात्र, भितीच वातावरण आहे. दिल्ली स्फोटात पाकिस्तानचा सहभाग आहे हे सिद्ध झालं तर? ही पाकिस्तानला मुख्य भिती आहे. या बद्दल रेडिटपासून एक्सपर्यंत पाकिस्तानी पोस्ट करत आहेत. ‘आता पाकिस्तानला यासाठी जबाबदार धरलं जाईल’ असं डॉक्टर फरहान विर्कने एक्सवर पोस्ट केलीय. “2 कारमध्ये ब्लास्ट झाले. यासाठी आता पाकिस्तानला जबाबदार धरलं जाईल. हे सर्व खोटं अभियान आहे” असं दुसरा युजर तैमूर मलिकने पोस्टमध्ये लिहिलय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय इशारा दिलाय?
अफगाणी नागरिक आणि पाकिस्तानवर नजर ठेवणाऱ्या बुरहानउद्दीनने पोस्टमध्ये लिहिलय की, “पाकिस्तानात ISIS सक्रीय आहे. पाकिस्तानात काही लोक दिल्ली स्फोटामुळे आनंदी आहेत. सगळ जग त्यांची कृती पाहत आहे”
“आज मी इथे जड अंतकरणाने आलोय. काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या भयावह घटनेने सर्वांच मन व्यथित झालय. या स्फोटामागे जे आहेत, ज्यांनी हे षडयंत्र रचलं त्यांना सोडणार नाही” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधून दिला आहे.