AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या देशाने गुलाम बनवले त्याच देशाच्या… ध्रुव राठी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, थेट लंडनमध्ये..

सीजेपीने मोठे आंदोलन केले. यादरम्यानच पोलिसांनी मोठी धरपकड केली. या आंदोलनाची धग थेट विदेशात पोहोचली. ध्रुव राठी यांनी विदेशात आंदोलन पुकारले. यादरम्यानच त्यांनी काही गंभीर आरोप केले.

ज्या देशाने गुलाम बनवले त्याच देशाच्या... ध्रुव राठी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, थेट लंडनमध्ये..
Dhruv Rathee
| Updated on: Oct 18, 2026 | 7:54 AM
Share

युट्यूबर ध्रुव राठी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचला होता. मात्र, भारतात पोहोचल्यानंतर त्याच्या समस्येत मोठी वाढ झाली. पोलिसांकडून त्याला त्याच्या गुरूग्राम येथील घरातून ताब्यात घेण्यात आले. यासोबतच त्याला पोलिसांनी जुन्या केसमध्ये समन्व बजावण्यात आला. त्यानंतर नामुष्कीने ध्रुव राठीला भारत सोडावा लागला. तो फक्त सीजेपीच्या आंदोलनासाठीच भारतात आला होता. कायद्याच्या कचाट्यात अडकत असल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ भारत सोडला. मात्र, त्याने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा लढा विदेशात सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. ध्रुव राठी लंडनला पोहोचला आणि त्याने लंडनच्या संसदेबाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. शनिवारी लंडनच्या संसद चाैक्यात त्यांनी आंदोलन सुरू केले.

यादरम्यान लोकही जमली होती. ध्रुव राठी याने म्हटले की, ज्या देशाने आपल्याला गुलाम बनवले. त्याच देशाच्या संसदेबाहेर उभे राहून मी आज उभे राहून बोलत आहे. हीच लोकशाही आहे. पुढे ध्रुव राठीने म्हटले की, आमच्या देशात विरोध प्रदर्शन करण्याची परवानगी नाहीये. पण ज्या देशाने आपल्यावर अतिक्रमक केले,त्याच देशाच्या संसदेबाहेर उभे राहून मी विरोध दर्शवत आहे.

बघा यालाच आज लोकशाही म्हणतात. दिल्लीमध्ये 35 हजार जवान जमवले गेले. 7 हजारांपेक्षा अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना मारहाण झाली. माझे तर माझ्या घरातून अपहरण करण्यात आले. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना समजून सांगा. त्यावेळी गर्दीतून एक व्यक्ती म्हणाला की, अरे ते अंद्धभक्त आहेत.. ते नाही ऐकणार कोणाचे काही.

यावेळी ध्रुव राठीने म्हटले की, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन नवीन निवडणुक आयुक्तांची निवड पंतप्रधान आणि विरोधी पक्षाने मिळून करावी. आम्हाला फक्त अपेक्षा इतकीच आहे की, नवीन निवडणूक आयुक्त हे भेदभाव करणारे नसावेत. सीजेपीचे आंदोलन आता थेट विदेशात पोहोचल्याचेही बघायला मिळत आहे. ध्रुव राठी लंडनच्या संसदेबाहेर निषेध करत असताना त्याच्या विरोधात घोषणाबाजीर करण्यात आली.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट