
जकार्ता– इंडोनेशियात (Indonesia)कुत्र्याचे मांस खाणे सहज झाले आहे. इंडोनेशियातील हॉटेलांमध्ये कुत्र्याचे मांस (Dog Meat)आणि त्याची ऑर्डर देणे हे सहज स्वीकारले जात आहे. या ठिकाणी राहत असलेल्या बटक लोकांसाठी प्रोटिन्सचा हा मुख्य स्रोत आहे. डॉग फ्री मीट इंडोनेशिया या संस्थेच्या अहवालानुसार या देशातील 7 टक्के नागरिक हे कुत्र्याचे मांस खात आहेत. इंडोनेशियाची 87 टक्के लोकसंख्या ही मुस्लीम आहे. मुस्लिमांत कुत्र्याचे मास खाण्यावर बंदी आहे. सुमारे 9 टक्के लोकसंख्या ही ख्रिश्चन (Christen)आहे. अल जजीराच्या एका वृत्तानुसार, इंडोनेशियात डॉग मीट अशा ठिकाणी खाण्यात येते आहे, ज्या ठिकाणी ख्रिश्चनांची लोकसंख्या अधिक आहे. यात उत्तर सुमात्रा, उत्तर सुलावेसी आणि पूर्व नुसा तेंगारा हे परिसर आहेत. ज्यात केवळ 9 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. आपल्याला भूक लागते म्हणून आपण कुत्र्याचे मास खातो, त्यातून शरिरासाठी उष्णता मिळते, असा युक्तिवाद इथे कुत्र्याचे मांस खाणारे करीत आहेत.
Indonesia’s dog meat business booms as about 7% of Indonesians are estimated to eat dog meat https://t.co/OM0g0qhMGP pic.twitter.com/TR445P1O3d
— Al Jazeera English (@AJEnglish) July 22, 2022
कुत्र्याचे मांस खाणे आणि त्याची मागणी वाढणे, ही प्राण्यांबाबतची क्रूरता आहे, असे प्राण्यांसाठी काम करणारे अधिकारी सांगत आहेत. इतकेच नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठीही कुत्र्याचे मास खाणे हे हानीकारक ठरु शकते, असेही हे अधिकारी सांगतायेत. यामुळे रेबिजसारख्या आजाराचे संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. दुसरीकडे इंडोनेशियात राहणारे अनेक रहिवासी चिकन, मटनप्रमाणेच कुत्र्याचे मास मानत आहेत. गेल्या काही वर्षांत कुत्र्याचे मास खाण्याचे प्रमाण वाढले असल्याची माहिती स्थानिक रहिवासी आणि अभ्यासक देत आहेत. मोलो नागरिक यांच्यात पूर्वापार डॉग मीट खाण्याची परंपरा न्वहती, मात्र गेल्या काही काळात याची सुरुवात झाली असून, आता हा प्रकार लोकप्रिय झाला असल्याचे सांगण्यात येते आहे.
पूर्व नुसा तेंगारा परिसरात कुत्र्याच्या मासाचे खाणे इतक्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे की, पुरवठादारांसमोर मागणी कशी पूर्ण करायची अशी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कुत्रे मारण्याच्या प्रमाणातही वाढ होताना दिसते आहे. रस्त्यांत आणि गल्ल्यांमध्ये खाण्याचे पदार्थ त्यावर पोटॅशियम टाकून ठेवले जातात. कुत्रे हे पदार्थ खातात आणि बेशुद्ध पडतायेत. मात्र या पोटॅशियमचा परिणाम कुत्र्यांच्या मासांवर होत नसल्याचे सांगण्यात येते आहे. अनेक जणांचे कुत्रे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत आहेत. डॉग मीट बंदीची चर्चाही सुरुये, मात्र त्याला स्थानिक विरोध करताना दिसत आहेत.