AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प रागाने लालेलाल, जीवलग मित्रदेशाने ती चूक करताच तुफान झापलं; इराण युद्धात…

ट्रम्प हे नेतान्याहू यांचे मित्र असले तरीही त्यांच्यात एवढी धुसफूस का चालली आहे, असे विचारले जात आहे. ट्रम्प इस्रायलवर नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

डोनाल्ड ट्रम्प रागाने लालेलाल, जीवलग मित्रदेशाने ती चूक करताच तुफान झापलं; इराण युद्धात...
donald trump and benjamin netanyahuImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2026 | 6:08 PM
Share

Donald Trump : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अद्याप संपलेलं नाही. दोन्ही देशांत मध्यस्थांच्या मार्फत युद्धसमाप्तीवर चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप यात कोणालाही यश आलेलं नाही. होर्मुझची सामुद्रधुनी, इराणकडे असलेला सक्रीय युरेनियमचा साठा या कळीच्या मुद्द्यांमुळे इराण-अमेरिकेत युद्धसमाप्तीचा करार सत्यात उतरत नाहीये. काही दिवसांपूर्वी आमचा इराणसोबत हा करार लवकरच अस्तित्त्वात येणार आहे, असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. परंतु आता इस्रायलकडून लेबनॉनवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे इराणने कठोर पवित्रा धारण केला असून युद्धसमाप्तीची चर्चाच थांबवली आहे, असा दावा केला जात आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेजामीन नेतान्याहू यांना कठोर शब्दांत सुनावलं आहे, असं सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामीन नेतान्याहू यांना अतिशय कठोर शब्दांत सुनावलं आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात जवळचे संबंध आहेत. इराणविरोधात हल्ला करताना हे दोन्ही देश एकत्र आले होते. परंतु आता हेच युद्ध धांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना इस्रायलकडून मात्र लेबनॉनवर हल्ले केले जात असल्याने ट्रम्प चांगलेच भडकले आहेत. ट्रम्प यांना नेतान्याहू यांना खडसावल्याचे एक्सियोस या अमेरिकन वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना फोन कॉल करून सुनावल्याचं बोललं जात आहे. या फोन कॉलमध्ये ट्रम्प चांगलेच भडकले होते. “तुमचं डोकं खराब आहे का. मी नसतो तर तुम्ही आतापर्यंत तुरुंगात असता. मीच तुमचा जीव वाचवतो आहे. तुमच्यामुळे प्रत्येकजण माझा तिरस्कार करत आहे. तुमच्या अशा कामांमुळे प्रत्येकजण इस्रायलचा तिरस्कार करतो,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना खडसावल्याचे बोलले जात आहे.

एवढा वाद का निर्माण झाला?

दरम्यान, ट्रम्प हे नेतान्याहू यांचे मित्र असले तरीही त्यांच्यात एवढी धुसफूस का चालली आहे, असे विचारले जात आहे. ट्रम्प इस्रायलवर नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, ट्रम्प यांची ही नाराजी नसून दोन्ही देशांमधील धोरणात्मक मतभेदांमुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. इराणसोबतचे युद्ध संपवून आपले हे जागतिक यश आहे, असे ट्रम्प यांना अमेरिका तसेच जगापुढे मांडायचे आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा मी सरस आहे, हेदेखील ट्रम्प यांना सिद्ध करून दाखवायचे आहे. त्यामुळेच त्यांचा हा खटाटोप चालू असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...