AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच… होर्मुझबाबत थेट आदेश; नको तेच घडणार…

Donald Trump : इराणसोबत शांततेची चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. हा निर्णय काय आहे ते जाणून घेऊयात.

मोठी बातमी! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच... होर्मुझबाबत थेट आदेश; नको तेच घडणार...
Donald Trump OrderImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 12, 2026 | 9:37 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांततेची चर्चा निष्फळ ठरली आहे. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही मुद्द्यांवर सहमती झालेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अमेरिका लवकरच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या जहाजांची नाकेबंदी सुरू करणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट आदेश

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, ‘अमेरिकन नौदल तात्काळ प्रभावाने होर्मुजमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तेथून बाहेर पडणाऱ्या सर्व जहाजांना थांबवण्याची प्रक्रिया सुरू करेल. मी माझ्या नौदलाला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला टोल भरणाऱ्या प्रत्येक जहाजाचा शोध घेऊन त्यांना थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.’ पुढे ट्रम्प यांनी आरोप केला की, इराणने या महत्त्वाच्या समुद्री मार्गाला खुला ठेवण्याच्या आपल्या आश्वासनांचे पालन केलेले नाही. समुद्रात बारूदी सुरंग असण्याच्या भीतीमुळे जहाजांची हालचाल आधीच प्रभावित झाली आहे. जर जहाजमालकांना वाटत असेल की कुठेही माइन असू शकते, तर ते धोका का पत्करतील? असा सवालही ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.

कोणताही करार झाला नाही

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे बोलताना हेही सांगितले की, इस्लामाबादमध्ये इराणी अधिकाऱ्यांसोबत सुमारे 20 तास चाललेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या इराणच्या अणु कार्यक्रमावर कोणताही करार होऊ शकला नाही. पुढे ट्रम्प यांनी म्हटले की, ‘इराण कधीही अण्वस्त्र मिळवू शकणार नाही. या विषयावर इराणचा दृष्टिकोन अजूनही कठोर आहे. जोपर्यंत इराण आपला अणु कार्यक्रम थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी चर्चा सुरू ठेवणे योग्य नाही.

बारूदी सुरंगांना हटवणार

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका होर्मुजमध्ये असलेल्या बारूदी सुरंगांना हटवण्याची मोहीम राबवेल. या कामात गुंतलेल्या अमेरिकन जहाजांवर गोळीबार करणाऱ्या इराणी सैन्याला कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच या भागात जहाजांकडून टोल वसूल करण्याच्या इराणच्या निर्णयाला ‘जबरदस्तीची वसुली’ असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ