AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे काही संकेत मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. यासोबतच काही मोठे आदेशही दिली आहेत.

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..
Donald Trump
| Updated on: May 23, 2026 | 11:53 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे काही संकेत मिळत आहेत. वृत्तांनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन इराणवर नवीन लष्करी हल्ल्यांची तयारी करत आहे. यादरम्यानच मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घेण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. मात्र, या लग्नाला डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार नाहीत. शिवाय आगामी सर्व दाैरेही रद्द करण्यात आलीत. अमेरिकेतील अधिकाऱ्यांचेही दाैरे रद्द करण्याचा मोठा निर्णय व्हाईट हाऊसने घेतला. ज्यामुळे पुढील काही तासात भयंकर घडण्याचे संकेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबापर्यंत हा संघर्ष येऊन पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीला टार्गेट करून हत्येचा कट रचण्यात आला. हा कट दुसरा तिसरा कोणीही नसून इराणच्या IRGC कडून रचण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प आता कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत बसणार नसल्याचे दिसतंय. अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. इराणवरील हल्ल्याबाबत अजून फायनल निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, परिस्थिती गंभीर आहे. सध्याची परिस्थिती बघता डोनाल्ड ट्रम्प यांनी मुलाच्या लग्नात सहभागी न होण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प जर स्वत:च्या मुलाच्या लग्नात सहभागी होत नाहीत म्हणजे परिस्थिती किती जास्त गंभीर आहे, याचा अंदाजा येऊ शकतो.

याव्यतिरिक्त, त्यांनी मेमोरियल डेला न्यू जर्सीला जाण्याचा आपला बेतही रद्द केला. ते व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. संभावित परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्यात. ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले की, सध्या इराणचा मुद्दा हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने स्पष्ट होते की, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विषय संपून टाकायचा आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असले तरीही मागच्या काही वेळापासून अमेरिकेत घडामोडींना वेग आला. आता अमेरिका इराणविरोधात नक्की काय निर्णय घेते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, काहीतरी भयंकर घडणार असल्याचेही दिसत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?