AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची हादरवणारी धमकी, आजच.. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर थेट..

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ल्यात ठार केले. आता इराणची जबाबदारी कोणावर आहे, याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठी प्रतिक्रिया देण्यात आलीये.

डोनाल्ड ट्रम्प यांची हादरवणारी धमकी, आजच.. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर थेट..
Donald Trump and Ayatollah Ali Khamenei
| Updated on: Mar 01, 2026 | 11:03 AM
Share

इराण सध्या संकटात आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. फक्त त्यांचा एकट्याचाच नाही तर त्यांच्या पूर्ण परिवाराचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा जिवंत असल्याचा दावा केला जात आहे. 8 देशातील अमेरिकन बेस असलेल्या ठिकाणांवर इराणने मोठा हल्ला केला. दुबईमधील प्रमुख ठिकाणांवरही हल्ला करण्यात आला. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर मिसाईलच्या वर्षाव केला जात आहे. आयातुल्ला अली खामेनेई ज्या भागात राहत होते, तिथे खूप मोठा मारा करण्यात आला. इराण देखील आक्रमक भूमिकेत असून मिसाईल इस्त्रायलच्या दिशेने टाकली जात आहेत. आयातुल्ला अली खामेनेई यांना हल्ल्यात ठार केल्याने जगात मोठी खळबळ उडाली. तात्काळ हे युद्ध थांबवा, अशी मागणी थेट चीनकडून करण्यात आली.

दुबईत मोठी हल्ले केली जात आहेत. अनेक भारतीय दुबईत अडकून पडली आहेत. हवाई वाहतूक बंद करण्यात आलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केली. यासोबतच आता त्यांनी अजून एक मोठे विधान केले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांनी थेट म्हटले की, आता इराणसोबत चर्चा करणे अधिक सोपे होईल.

अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणकडून सांगण्यात आले की, चर्चा सुरू असताना हा हल्ला आमच्यावर करण्यात आला. आयातुल्ला अली खामेनेई आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणला धमकावले जात होते. मात्र, इराणकडूनही थेट अमेरिकेला धमक्या दिल्या जात होत्या.

शेवटी काल युद्धास सुरूवात झाली आणि अवघ्या 24 तासांमध्ये आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार करण्यात आले. चीन आणि रशियाकडून अमेरिका आणि इस्त्रायल यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. तेहरान शहराचे मोठे नुकसान करण्यात आले. सरकारी इमारती अमेरिकेच्या निशाण्यावर होत्या. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच जगाची झोप उडवणारी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली असून त्यांनी म्हटले की, इराणवर आजपर्यतचा मोठा हल्ला आजच होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...