Iran Israel War : आता सर्वात मोठा हल्ला! डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुल्या धमकीने खळबळ; इराणमध्ये थेट…

इराणने आखाती देशांची माफी मागितली आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने आत्मसमर्पण केले आहे, असा दावा केला आहे. तसेच आता इराणवर आणखी मोठा हल्ला करू, असेही त्यांनी सांगितले आहे.

Iran Israel War : आता सर्वात मोठा हल्ला! डोनाल्ड ट्रम्प यांच्या खुल्या धमकीने खळबळ; इराणमध्ये थेट...
donald trump and iran israel war
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 07, 2026 | 7:23 PM

Iran Israel War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. इस्रायलयने इराणविरोधात चालू केलेल्या युद्धमोहिमेला अमेरिकेचा खुला पाठिंबा आहे. अमेरिकेने इराणवर अनेक मोठे हल्ले केलेले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेने हिंद महासागरात आलेल्या इराणच्या युद्धनौकेवरही पाणबुडीच्या मदतीने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या 87 खलाशांचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत इराण कोणतीही अट न ठेवता शरणागती पत्करत नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर करून टाकलेले आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या भूमिकेने खळबळ उडाली आहे. त्यांनी इराण आता पराभूत झाला असून आणखी मोठा हल्ला करू, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

इराणने माफी मागून आत्मसमर्पण केले

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल ट्रुथ या सोशल मीडिया माध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इराणवर कठोर शब्दांत टीका केली आहे. आता इराण खूपच वाईट पद्धतीने पराभूत झाला आहे. त्यांनी माफी मागून आत्मसमर्पण केले आहे. तसेच आता आम्ही आखाती देशांवर हल्ले करणार नाही, असे इराणने मान्य केले आहे. अमेरिका आणि इस्रायच्या हल्ल्यांमुळेच इराणने अशी भूमिका घेतली आहे. मध्य पूर्वेला ताब्यात घेऊन इराणला त्या प्रदेशावर राज्य करायचे होते. आता पंहिल्यांदाच इराण मध्य पूर्वेतील देशांपुढे पराभूत झाला आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली.

इराणवर आणखी मोठा हल्ला करू

यासह, इराण आता मध्य पूर्वेतील दादा राहिलेला नाही. इराण जोपर्यंत आत्मसमर्पण करत नाही, तोपर्यंत आम्ही असेच हल्ले करत राहू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. यासह आज इराणवर आणखी मोठा हल्ला होईल, असे सूतोवाचही त्यांनी केले.

इराणने मागितली आखाती देशांची माफी

दरम्यान, इराणच्या राष्ट्रपतींनी आखाती देशांची माफी मागितली आहे. त्यांनी तुमच्या प्रदेशातून इराणवर हल्ले होणार नसतील, तर आम्हीही तुमच्यावर हल्ले करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याच भूमिकेनंतर ट्रम्प यांनी इराणने माघार घेतल्याचा, आत्मसमपर्पण केल्याचा दावा केला आहे. इराणने मात्र आम्ही राहू असे सांगितले आहे.

Follow Us