AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला हादरवणारी बातमी… ट्रम्प यांची खुर्ची जाणार? मोठा भूकंप? कायदा काय सांगतो?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणवरील आक्रमक भूमिकेमुळे जागतिक महागाई वाढली आहे. ट्रम्प यांच्या 'सणकी' वृत्तीला लगाम घालण्यासाठी अमेरिकन संसदेत 25 व्या घटनादुरुस्तीतील कलम 4 लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. यामुळे ट्रम्प यांना पदावरून हटवणे शक्य होईल, अशी चर्चा आहे, कारण त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जगाला हादरवणारी बातमी... ट्रम्प यांची खुर्ची जाणार? मोठा भूकंप? कायदा काय सांगतो?
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Apr 06, 2026 | 2:43 PM
Share

Donald Trump In Trouble : सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना जगानेच नव्हे तर अमेरिकेतील जनतेनेही घेरले आहे. इराण विरुद्ध युद्ध पुकारल्याने त्याची झळ जगाला बसत आहे. जगात महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधनाचे भाव आकाशाला भिडले आहेत. अनेक देशात तर इंधन मिळेनासं झालं आहे. केवळ ट्रम्प यांच्या सणकी वृत्तीमुळे या सर्व गोष्टी घडल्या आहेत. आता तर ट्रम्प यांनी इराणच्या विरोधात अश्लील भाषेचा वरेमाप वापर सुरू केला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांची सणक दूर करण्यासाठी अमेरिकन संसदेत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये आता घटनेतील 25 व्या दुरुस्तीतील कलम 4 लागू करण्याची मागणी जोर धरत आहे. या कायद्यामुळे ट्रम्प यांच्या सणकी वृत्तीला लगाम बसणार आहे. विशेष म्हणजे असा कायदा अस्तित्वात आल्यास ट्रम्प यांची पदावरून उचलबांगडी करणंही सोपं होणार आहे.

ईस्टरच्या निमित्ताने ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी इराणचा अश्लील भाषेत उद्धार केला होता. तसेच होर्मुज न उघडल्यास पॉवर प्लांट आणि पूल तोडमअयाची धमकी ट्रम्प यांनी दिली. पण ही धमकी देताना अश्लील भाषेचा वापर केला. त्यामुळे जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या सणकी कारभाराला लगाम लावण्यासाठी अमेरिकेतील नेते पुढे सरसावल्याचं सांगितलं जात आहे.

मध्यपूर्वेतील युद्धाच्या दरम्यान ही पोस्ट अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. अशावेळी डेमोक्रॅट्सने 25 व्या दुरुस्तीची मागणी केली आहे. डेमोक्रॅटिकचे सिनेटर क्रिस मर्फी यांनी एक्सवर याबाबतची पोस्ट लिहिली आहे. जर मी ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये असतो तर मी संविधानाची 25वी दुरुस्ती लागू करण्यासाठी वकिलांशी चर्चा केली असती. ट्रम्प यांचं वागणं वेडेपणाचं लक्षण आहे, असं क्रिस यांनी म्हटलं आहे. एमएसएनबीसीचे माजी होस्ट मेहदी हसन यांनीही ट्विट केलं आहे. उपराष्ट्रपती आणि कॅबिनेटने आता लगेच 25 व्या दुरुस्तीचे कलम 4 लागू केलं पाहिजे, असं हसन यांनी म्हटलं आहे.

काय आहे 25वी दुरुस्ती?

अमेरिकेच्या संविधानातील ही एक महत्त्वाची तरतूद आहे. 1967मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर ही दुरुस्ती मंजूर करण्यात आली होती. जर राष्ट्रपतीचा मृत्यू झाला, त्यांनी राजीनामा दिला, किंवा त्यांना हटवल्या गेलं किंवा राष्ट्रपती अकार्यक्षम झाला तर उपराष्ट्रपतींकडे सत्ता सोपवण्याची प्रक्रिया निश्चित केली पाहिजे, असा या दुरुस्तीचा हेतू होता. यात एकूण चार कलम होती. त्यातील चौथे कलम आताच्या परिस्थितीत लागू करण्याची मागणी होत आहे.

कलम 1: जर राष्ट्रपतीचं निधन झालं, त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना हटवण्यात आलं तर उपराष्ट्रपती हेच राष्ट्रपती बनतात.

कलम 2 : जर उपराष्ट्रपतीपद रिक्त असेल तर राष्ट्रपती नव्या नावाचा प्रस्ताव मांडतो, त्याला काँग्रेसची मंजुरी हवी.

कलम 3 : जर राष्ट्रपती स्वत:ला तात्पुरतं अकार्यक्षम समजत असेल तर ते उपराष्ट्रपतींकडे तात्पुरती सत्ता सोपवू शकतात.

कलम 4: हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण यात उपराष्ट्रपती आणि कॅबिनेटमध्ये बहुमत (15 पैकी 8) ला अधिकार देण्यात आले आहेत. राष्ट्रपती आपले कर्तव्य बजावण्यात असमर्थ आहेत, असं लिखित रुपाने उपराष्ट्रपती आणि काँग्रेस घोषित करू शकते. त्यानंतर उपराष्ट्रपती लगेच राष्ट्रपती म्हणून सक्रिय होतात. जर राष्ट्रपतीने आपण सक्षम असल्याचं सांगितलं तर चा दिवसात कॅबिनेट आणि उपराष्ट्रपतींना काँग्रेसमध्ये दोन तृतियांश बहुमत सिद्ध करावे लागते.

मागणी का होत आहे?

ट्रम्प इराण युद्धाच्या अनुषंगाने वारंवार शब्द बदलत आहे. रणनीती बदलत आहेत. तसेच शिवीगाळ करणारे पोस्ट लिहित आहेत. त्यावरून ट्रम्प यांचं मानसिक आरोग्य ढासळलंय असं दिसून येत आहे, म्हणूनच अमेरिकेच्या खासदारांनी या संविधानातील दुरुस्ती कलम लागू करण्याची मागणी लावून धरली आहे. इराण युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत. दुसरीकडे ट्रम्प हे हवाई नियंत्रणाच्या बातमा मारत आहेत. पण इराणचे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. राष्ट्रपतीचं वागणं हे देश आणि जगासाठी धोकादायक बनू शकतं. त्यामुळेच कॅबिनेट आणि उपराष्ट्रपतीने पावलं उचलण्याची मागणी जोर धरत आहे. त्याचवेळी रिपब्लिकन खासदारांमध्येही ट्रम्प यांच्या राजकीय धोरणावर असहमतीचा सूर उमटत आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?