AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा डाव, थेट आपल्या दूतालाच..

स्वतः पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना भेटू शकतात, परंतु जर चर्चा पुढे सरकली तर. अगोदर लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल युक्रेनी अधिकाऱ्यांसोबत बोलतील. सध्या अमेरिकेकडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा डाव, थेट आपल्या दूतालाच..
Donald Trump
| Updated on: Nov 26, 2025 | 9:29 AM
Share

रशिया युक्रेन युद्ध सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे खास प्लॅन आहे. अमेरिकेच्या पहिल्या शांतता प्रस्तावाला युक्रेनने केराची टोपली दाखवली. त्यानंतर आता अमेरिकेने दुसरा प्लॅन तयार केला. मागील काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अगोदर या युद्धासाठी युक्रेनला मोठी मदत अमेरिकेने केली आहे. रशिया युक्रेन युद्ध अमेरिकेमुळेच पेटल्याचा आरोप अनेक देश करतात. त्यामध्येच आता अमेरिकेकडून शांतता प्रस्ताव दोन्ही देशांनी दिली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता त्यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी पाठवले आहे.

लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल युक्रेनियन अधिकाऱ्यांशी बोलतील. ट्रम्प म्हणाले की, ते स्वतः पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना भेटू शकतात, परंतु जर चर्चा पुढे सरकली तरच. अगोदर लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल युक्रेनी अधिकाऱ्यांसोबत बोलतील. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मला सर्व माहिती दिली जाईल, ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ज्यामध्ये उपाध्यक्ष जेडी व्हान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, सचिव पीट हेगसेथ आणि व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ सुसी विल्स यांचाही समावेश असेल.

लष्कर सचिव ड्रिस्कॉल यांचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉल्बर्ट यांनी म्हटले आहे की, चर्चा चांगल्या प्रकारे सुरू आहेत, आम्ही आशावादी नक्कीच आहोत. या चर्चा सुरू असतानाच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ले सुरू केले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, शांतता प्रयत्नांना गती मिळत आहे आणि ते “स्पष्टपणे एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत.”जिनेव्हा येथे अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमधील बैठकीनंतर ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनच्या अध्यक्षांवर टीका करताना दिसले. युक्रेनच्या अध्यक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, आम्ही कधीच तुम्ही अमेरिकेचे मदतीसाठी आभार मानले नाहीत आणि असे विधाने करत आहेत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर युक्रेनच्या अध्यक्षांनी अमेरिकेचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ