AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया युक्रेन युद्ध थांबणार? थेट 6 दिवसांचे अल्टिमेटम, राष्ट्राध्यक्षालाच पाठवले जाणार तुरुंगात…

रशिया युक्रेन युद्ध टोकाला पोहोचल्याचे सध्या बघायला मिळतंय. रशियाकडून युक्रेनवरील हल्ले वाढवण्यात आली. रशिया आता युक्रेनच्य ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट करताना दिसतोय. युक्रेनवरील दबाव प्रचंड वाढल्याचे सध्या बघायला मिळतंय.

रशिया युक्रेन युद्ध थांबणार? थेट 6 दिवसांचे अल्टिमेटम, राष्ट्राध्यक्षालाच पाठवले जाणार तुरुंगात...
Russia Ukraine War
| Updated on: Nov 21, 2025 | 12:59 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा युक्रेन रशिया युद्धात मध्यस्थी करताना दिसत आहेत. रशिया-युक्रेन शांतता कराराबाबत वोलोदिमिर झेलेन्स्की यांना अल्टिमेटम दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले आहे की, जर त्यांनी 27 नोव्हेंबरपर्यंत 28 कलमी शांतता योजनेवर सही केली नाही तर त्यांना सत्तेकडून काढून टाकले जाईल. वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नुकताच म्हटले होते की, मी पश्चिमी देशांसारखे अजिबातच डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत नाही. त्यानंतर आता थेट सत्तेतून झेलेन्स्की यांना काढून टाकण्याची भाषा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. हेच नाही तर रशिया युक्रेन शांतता करारावर सही करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना टार्गेट केलंय. रशियाकडे युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केली जात आहेत. युक्रेनने अमेरिकेकडे घातक क्षेपणाशास्त्रांची मागणी केली. मात्र, घातक क्षेपणास्त्र देण्याऐवजी अमेरिकेने शांतता करारावर सह्या करण्यास वोलोदिमिर झेलेन्स्की यांना सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसापासून रशिया युक्रेन शांतता करारासाठी आग्रही आहेत. मात्र, दोन्ही देश ऐकण्यास तयार नाहीत. त्यामध्येच आता 28 कलमी शांतता करार तयार करण्यात आलाय. मात्र, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की करारावर सह्या करण्यास तयार नाहीत. अशातच आता थेट मोठी धमकी देण्यात आली. वोलोदिमिर झेलेन्स्की यांची आणि पुतिन यांची भेट डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच घेतली. दोन्ही देशाचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्कीला धमकी देत ​​म्हटले की, सत्तेवरून काढून टाकल्यानंतर तुम्हाला ताबडतोब तुरुंगात पाठवले जाईल. कोणत्याही किंमतीत युद्ध थांबवायचे आहे. ट्रम्प यांचा हा कडक संदेश अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने झेलेन्स्कीला दिला. फक्त सत्तेतून बाहेर काढले जाणार नाही तर झेलेन्स्कीला थेट जेलमध्ये पाठवले जाईल, असेही अमेरिकेने स्पष्ट शब्दात म्हटले आहे.

झेलेन्स्की यांच्या अत्यंत जवळच्या सहकार्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यापैकी दोघे झेलेन्स्की यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. दोघांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणांमुळे झेलेन्स्की दबावाखाली आले आहेत. दोन कॅबिनेट मंत्र्यांचा भ्रष्टाचार घोटाळा झेलेन्स्कीपर्यंतही पोहोचू शकतो, असेही अमेरिकेने म्हटले.

अमेरिकन सरकारने गुप्तपणे एक शांतता योजना विकसित केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. युद्धानंतर युक्रेनला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून मिळणारे सर्व अधिकार असतील, काही अटींच्या अधीन राहून. युरोप, रशिया आणि युक्रेनमधील तीन दशकांपासून असलेला तणाव पूर्णपणे संपेल, असा दावा अमेरिका करत आहे. आता या झेलेन्स्की काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.