
इराणमधील परिस्थितीवर जगाच्या नजरा आहेत. सरकारविरोधात इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले असून जोरदार आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला आणि थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इराणची जनता त्यांच्या संघर्षात अंतिम टप्प्यात आहे आणि विजयाच्या तुम्ही अत्यंत जवळ असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात म्हटले. अमेरिका इराणमधील लोकांच्या मदतीला येणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यावेळी इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प असल्याचे सांगितले गेले. मात्र, इराणमधील परिस्थितीमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. मात्र, आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील परिस्थिती तणावात आहेत. संपूर्ण इराणला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
इराणनेही मोठी धमकी देत डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात यापूर्वीच सांगितले की, आमच्या देशातील मुद्द्यांमध्ये कोणी हस्तक्षेप केला तर आम्ही हात तोडू. यादरम्यान आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली. यामुळे गोष्टी अधिक चिघळताना दिसत आहेत. एका मुलाखतीत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही संपूर्ण देश उद्ध्वस्त करू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने तणाव हा अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
ट्रम्प म्हणाले, आम्ही यापूर्वीही इराणला इशारा दिला आहे, जर काही घडले तर त्यांना अत्यंंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. काहीही झाले तरीही आम्ही त्यांचा संपूर्ण देश नष्ट करू… अमेरिेकेने हल्ला करण्याचा इशारा दिल्यानंतर इराणने सांगितले की, आम्ही देखील युद्धासाठी तयार आहोत. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.
मध्यंतरी अशी एक चर्चा होती की, कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. मात्र, ज्याप्रकारे इराण देखील अमेरिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे, ज्यावरून अमेरिका हल्ला करणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणमधील परिस्थिती गंभीर असल्याचे वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगितले जात आहे.