AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड केलं गुपित, पाकिस्तानसोबत…

Donald Trump : मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री अधिकच वाढताना दिसत आहे. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल मोठा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी भारताचा देखील उल्लेख केला.

भारताला सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड केलं गुपित, पाकिस्तानसोबत...
Donald Trump
| Updated on: Oct 01, 2025 | 7:55 AM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला. हेच नाही तर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दोन्ही देशांकडून मोठी हल्ले केली जात होती. भारत-पाक युद्ध अधिक चिघळताना दिसले. मात्र, दोन्ही देशातील लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यातून मार्ग काढला आणि युद्ध थांबले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने दावा करत आहेत की, त्यांनी भारत-पाक युद्ध थांबवले. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकला फोन लावला आणि युद्ध थांबवण्यासाठी धमकी दिली आणि त्यानंतरच हे मोठे युद्ध थांबले. मात्र, भारताने कायमच स्पष्ट केले की, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आम्ही युद्ध थांबवले नाही.

आता नुकत्याच परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मी भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध बंदी घडून आणली. एक मोठे युद्ध रोखता आले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीश हे माझ्यासोबत होते. ते पाकिस्तानमधील महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी लोकांच्या एका ग्रुपला सांगितले की, या व्यक्तीमुळे लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.

कारण त्यांनी युद्ध रोखले आहे. कारण ते युद्ध खूप जास्त वाईट होणार होते. पंतप्रधान शहबाज आणि आसिम मुनीश यांचे बोलेणे ऐकून मला खूप जास्त सन्माजनक वाटत होते. मला ते ज्या पद्धतीने बोलत होते ते प्रचंड आवडले. मला त्यांनी जे काही बोलले त्यापैकी सर्वात जास्त आवडले की, त्यांनी म्हटले या व्यक्तीमुळे लाखो जीव वाचले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, भारत-पाकिस्तान युद्ध इतके पेटले होते की सात विमाने हल्ल्यात पाडण्यात आली.

पाकिस्तानची पाडली की, भारताची हे त्यांनी यावेळी सांगितले नाही. ज्यावेळी हे युद्ध सुरू होते, त्यावेळी मी दोन्ही देशांच्या नेत्यांना फोन करून म्हटले की, तुम्ही असे करू शकत नाहीत. तुम्ही परमाणू संपन्न देश आहात आणि तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात परमाणू आहेत. एका सर्वात मोठ्या युद्धाला मी थांबवले. .यावरून हे स्पष्ट होते की, आसिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान किती जास्त चापलूसी केली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचे बोलणे ऐकून भारत आणि अमेरिकेतील तणाव अधिकच वाढण्याचे संकेत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...